IMPIMP

जाणून घ्या 7 जूनचे राशीफळ; ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग

by omkar
horoscope

सरकारसत्ता ऑनलाइन – मेष : (Horoscope) व्यस्तता आणि धावपळीचा दिवस आहे. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर धावपळ करावी लागेल. संततीच्या शिक्षणासाठी प्रवास कराल.
सायंकाळी तणाव जाणवेल, रागामुळे कामे बिघडतील. सतर्क रहा आणि वाणी मधूर ठेवा.
घेतलेले कर्ज किंवा वस्तू वेळेवर न दिल्याने समस्या होऊ शकते. पैशाच्या व्यवहारात ज्येष्ठांच्या सल्ल्याने लाभ होईल.

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

वृषभ (Horoscope)
दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. जे काम बुद्धी आणि विवेकाने कराल त्यामध्ये भरपूर यश मिळेल. संततीच्या भविष्यासाठी धावपळ करावी लागेल.
संततीसाठी एखादे कठोर पाऊल उचलाल, ज्यामुळे त्रास सुद्धा होईल. पण भविषयासाठी आवश्यक असेल.
मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका, यशात बाधा येऊ शकते.

मिथुन (Horoscope)
दिवस विशेष चिंतेत जाईल. संततीच्या बाबत अनपेक्षित माहिती मिळाल्याने त्रास होईल.
विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यापारासाठी दूरचा प्रवास करावा लागेल, पण विचारपूर्वक करा अन्यथा त्रास होईल.
विवाहाच चांगले प्रस्ताव येतील. कुटुंबाकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

कर्क
दिवस सामान्य आहे. सरकारी नोकरीत अधिकार्‍याशी वाद होऊ शकतो, यामुळे प्रगतीत बाधा येऊ शकते. मानसिकदृष्ट्या अशांत रहाल.
कुटुंबात तणाव राहील, वडीलांच्या मध्यस्तीेने तो संपेल. संततीकडून आनंदाची बातमी समजेल.
सायंकाळ मित्रांसोबत आनंदा घालवाल. नोकरीत महिलेमुळे मानहानी होऊ शकते, संबंध मर्यादित ठेवा.

सिंह
काही तरी करून दाखवण्यात दिवस घालवाल. सकाळपासूनच अर्धवट कामे पूर्ण करण्यास सुरूवात कराल. आर्थिकदृष्ट्या दिवस सामान्य आहे. व्यापारात आंशिक लाभ होईल.
कामात एखाद्या हस्तेक्षपामुळे त्रास होईल. अरोग्य अनुकूल राहिल्याने कामात जास्त गंभीर रहाल. राजकारणात मान सन्मान मिळेल.
सासरकडील व्यक्तीला पैसे उधार देताना विचार करून द्या. नाते बिघडू शकते.

कन्या
धैर्याने काम करा, यश मिळेल. समाधानी राहिलात तर धावपळ होणार नाही.
अचानक धनलाभ झाल्याने खर्च भागतील. कार्यक्षेत्रात लोक तोंडावर कौतूक करतील अणि मागे टीक करतील. नोकरी आणि कामात शांत राहण्याने लाभ होईल.
सायंकाळचा वेळ मंगलकार्यात घालवाल.

तुळ
दिवस उत्तम फलदायक आहे. जवळच्या मित्राच्या सल्ल्याने काम मार्गी लागेल.
काम निष्ठेने कराल पण निष्काळजीपणा सुद्धा कराल, सतर्क रहा. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य घसरू शकते, सतर्क रहा, खाणे-पिणे चांगले घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
सायंकाळी मित्रांशी गप्पागोष्टी कराल, महत्वाची माहिती मिळेल.

वृश्चिक
दिवस संमिश्र परिणामांचा आहे. इतरांच्या भरोशावर राहण्याने फसवणुक होईल. तज्ज्ञाचा सल्ला भविष्यात उपयोगी पडेल. बिझनेसमधील समस्या वडील आणि भावाला सांगाल.
ते मदत करतील. संततीच्या भविष्यासाठ योजना बनवाल.
सायंकाळी संततीशी चर्चा कराल, ज्यातून समस्येतून मार्ग काढाल.

धनु  
दिवस संमिश्र आहे. हातात मोठ्या प्रमाणात पैसा येईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. कलाक्षेत्रात नवीन उपक्रम सुरू कराल.
कुटुंबात सुखशांती राहील. रोजगार मिळेल. प्रेमजीवनात नवी उर्जा मिळेल.
सायंकाळीचा वेळ आई-वडीलांच्या सेवेत घालवाल.

मकर
दिवस उत्तम फळ देणारा आहे, परंतु इच्छापूर्तीच्या विरूद्ध काम कराल, ज्यामुळे नुकसान होईल. भागीदाराची व्यवसायात यश मिळेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल, यातून लाभ होईल.
कौटुंबिक वातावरण बिघडेल, यापासू दूर रहा आणि सर्वांशी प्रेमाने बोला, अन्यथा तणाव वाढू शकतो.

कुंभ
दिवस प्रगतीचे नवे मार्ग खुले करेल. व्यापारातील सर्व कामे निर्विघ्न पूर्ण होतील, मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे होतील.
उधार दिलेले पैसे परत मिळतील. दैनिक गरजांसाठी पैसे खर्च कराल. मालमत्ता खरेदीसाठी दिवस उत्तम.

मीन

अनुकूल परिणाम देणारा दिवस आहे. सरकारकडून लाभ मिळेल. प्रयत्नानंतर रखडलेली कामे पूर्ण होतील.
पैसे खर्च होतील. अधिकारी आणि घरातील ज्येष्ठांकडून सहजपणे काम करून घ्याल.
सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. सायंकाळी गुरुंना भेटवस्तू द्याल.

Also Read:- 

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

Pune Crime News : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीचा 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केला खून; ‘कोरोना’ काळाचा घेतला फायदा, लोणीकाळभोर परिसरातील घटना

Pune Crime News : लग्नापुर्वीचं ‘झेंगाट’ सुरूच, नवरा बनला होता अडसर ! 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला दुधातून झोपेच्या गोळया देऊन मारलं, पुण्यातील खळबळजनक घटना(affair)

पुण्यात आता घरोघरी जाऊन लसीकरणाला सुरुवात, शहरात पहिलाच प्रयोग

 

Related Posts