IMPIMP

ज्येष्ठांच्या सांभाळासाठी आणखी एका कायद्याचा ‘आधार’; मोदी सरकारचे आणखी एक पाऊल

by sikandershaikh
new steps of modi govt to care seniors clear way get legal support

नवी दिल्ली :सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)modi govt | दिवसेंदिवस वाढत असलेली विभक्त कुटूंब पद्धत आणि तरुणांचा शहरांकडे असणारा ओढा यामुळे ज्येष्ठांना एकाकीपण येऊ पाहत आहे तर अनेकांच्या उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण होत असतो. यातून ज्येष्ठांचा सांभाळ करण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.कोणीही त्यांचा सांभाळ करण्यास तयार होत नाही. मात्र, दुसरीकडे त्यांच्या संपत्तीत मुला-मुलींप्रमाणेच सून व जावईदेखील हक्क सांगत असतो. त्यामुळे आता या सर्वांना पाल्याच्या व्याख्येत आणून त्यांच्याकडून ज्येष्ठांना निर्वाह भक्ता मिळवण्याची तरतूद असलेला नवा कायदा संसदेपुढे मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठाना कायदेशीर आणि हक्काचा आधार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

कोणालाही म्हातारपण नकोच असत कारण शरीर थकलेलं असत. मानसिकदृष्ट्याही व्यक्ती खचलेली असते. अशावेळी त्यांना आधाराचा हात हवा असतो, मात्र बसध्याची बदललेली सामाजिक व कौटुंबिक परिस्थिती पाहता ज्येष्ठांना असा हात मिळेलच असं नाही. आयुष्यभर स्वतःच्या मर्जीने जगलेल्या माणसांना परावलंबी झाल्यानंतर मनातील घुसमट असह्य होते. धड ती सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठांचे कल्याण व त्यांच्या आधारासाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. पाल्यांकडून ज्येष्ठांना निर्वाह खर्च मिळवण्याची कायद्यात तरतूद असली किंवा त्यांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना दंड व तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही असली तरी प्रतिष्ठेच्या दडपणाखाली त्याकडे कोणीही जात नाही. या कारणामुळेच म्हातारपण नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ येते. ज्येष्ठावर अशी वेळ का ओढवते, हा चिंतनाचा विषय असून, समाज धुरिणांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

पूर्वी एकत्र कुटूंब पद्धतीमुळे ज्येष्ठांचा वेळही निघून जाई व त्यांची काळजीही घेतली जाण्याची सोय आपसूक होई; परंतु आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे सर्व बदलून गेले आहे. तसेच तरुणांचा उद्योगासाठी शहराकडे ओढा वाढला. त्यामुळे घरातील ज्येष्ठांच्या वाट्याला एकाकीपण आला. हवापालटासाठी जरी ज्येष्ठ मंडळी शहरात आली तरी ते रमत नाही पुन्हा गावाकडे निघून जातात.
पूर्वी नातवंडांना आईबाबांपेक्षा आजी-आजोबा अधिक मैत्रीचे ठरत. ते त्यांना राजा-राणीच्या परिकथा सांगत; खेळायला नेत.
आता ही स्थितीही बदलली आहे. हल्लीच्या नातवंडांना पोकेमॉन व डोरेमॉन हवा असतो.
आजोबांबरोबर फिरायला जाण्यापेक्षा टीव्हीचा रिमोट घेऊन किंवा मोबाइलमध्ये डोके घालून बसणे त्यांना अधिक आवडते, तेव्हा त्याहीदृष्टीने घरातील ज्येष्ठ मंडळी एकाकी पडलेली दिसते.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

सध्याची महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे घरच सर्व काही ठीक असतानाही ज्यांच्या नशिबी वृद्धाश्रम येते त्यांची मानसिक अवस्था मात्र चिंतनीय ठरते.
पण परिस्थिती व नशिबाला दोष देत संबंधितांकडून दिवस काढले जातात.
खरे तर ही अवस्था संस्कार व संवेदनेशी निगडित आहे, पण आता मोल उरले कुठे?
शासनाने आता पाल्याची किंवा अपत्त्याची व्याख्या विस्तारत त्यात मुला-मुलींसोबतच सून व जावयाचा
समावेश करण्याचेही ठरवले असून, त्यांना घरातील ज्येष्ठांना निर्वाह खर्च देणे जबाबदारीचे केले जाणार आहे. या नवीन विधेयकाला

संसदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली असून, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाणार आहे.
अर्थात ज्येष्ठांची काळजी वाहण्यासाठी कायदे अनेक असले व त्यात आणखी भर पडणार आहे मात्र याच्या वाटेला कोण जात असाही प्रश्न आहे.
या नवीन कायद्याने ज्येष्ठांना आधाराचा आणखी एक हात लाभेल अशी आशा आहे.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ पत्रामुळं वातावरण तापणार ! छत्रपती शिवाजी पार्कमध्ये ‘काका-पुतण्या’ आमनेसामने ?

Related Posts