IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 172 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus | Coronas havoc Infection of 40 leaders including three Chief Ministers four Deputy Chief Ministers six Union Ministers

पिंपरी न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (बुधवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. मात्र अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारांच्या वर गेल्याने. चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) 172 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 172 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 576 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 189 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 62 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1086 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 02 रुग्णाच्या मृत्यूची नोंद
झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4382 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी (दि.18) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण
(Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 18 हजार 322 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 80 हजार 247 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 172 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मोक्कामध्ये फरार असलेल्या गायकवाड बाप-लेकावर पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या

NDA Exam for Women | आता महिला सुद्धा देऊ शकतात एनडीएची परीक्षा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 

Related Posts