IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मोबाईल लोन (Mobile Loan) करुन देतो असे सांगून एका व्यक्तीची 55 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी (PCPC Police) एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 14 जुलै ते 15 जुलै 2023 या कालावधीत पुनावळे येथील साई सिद्धी मोबाईल सेंटर येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत सिकंदर श्रावण भालेराव (वय-43 रा. ताजने वस्ती, पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात (Rawet Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शरद बाळु जाधव (वय पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 420, 406, 468, 471 नुसार गुन्हा दखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी सिकंदर भालेराव हे चालक आहेत. त्यांना नवीन मोबाईल घ्यायचा होता.
त्यामुळे ते आरोपीच्या मोबाईल दुकानात गेले. आरोपीने फिर्यादी यांना मोबाईल लोन करुन देतो असे सांगून त्यांचा
विश्वास संपादन केला. लोन करुन देण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्याकडून कागदपत्रे घेतली.

यानंतर फिर्यादी यांच्या कागदपत्रांच्या आधारे यांची बनावट सही करुन 49 हजार 938 रुपयांचे लोन केले.
फिर्यादी यांच्याकडे सध्या बँकेचे 55 हजार 229 रुपये आऊटस्टँडिंग आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर
भालेराव यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली.
पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

Related Posts