IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 200 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | 171 new patients of 'Corona' in Pune city in last 24 hours, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (मंगळवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 200 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 200 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 958 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 64 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शहरात 1428 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1428 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4400 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

शहरात 4565 जणांचे लसीकरण

गुरुवारी (दि.2) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 4565 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 14 लाख 80 हजार 069 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title : Pimpri Corona | 200 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 222 नवीन रुग्णांचे निदान, अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ, जाणून घ्या आकडेवारी

Anti Corruption | 27000 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह रिक्षाचालक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Anti Corruption | महिलेकडे 30,000 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

 

Related Posts