IMPIMP

समता प्रतिष्ठान घोटाळ्याप्रकरणी 13 जण निलंबित; SIT चौकशीही होणार

by bali123
samata pratishthan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) विधीमंडळाच्या प्रश्न उत्तर तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी बार्टीअंतर्गत नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमधील घोटाळ्यासंदर्भात भ्रष्टाचारासह विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना तपासात गेल्या सरकारच्या काळात समता प्रतिष्ठानमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याची बाब समोर आली असून प्रतिष्ठानमधील १३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित करीत असल्याची घोषणा केली. एवढेच नाही तर या प्रकरणाची एसआयटी चौकशीही होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी समता प्रतिष्ठानमध्ये ढळढळीत भ्रष्टाचार झालेला आहे, आधीच्या मंत्र्यांचे कोण नातेवाईक त्यात आहेत, घोटाळेबाजांवर काय कारवाई करणार, निविदा न काढताच कामे देण्यात का आली, असा सवाल त्यांनी केला. त्यावर, धनंजय मुंडे यांनी उत्तर देताना साडेतीन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब अंकेक्षण अहवालात समोर आली आहे. शासनाकडून संस्थेला देण्यात आलेल्या १६ कोेटींपैकी १४ कोटींच्या रकमेत घोटाळे झाल्याचा अंदाज आहे. सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल येताच कारवाई केली जाईल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कॅगच्या अहवालात कुठलाही ठपका नाही ही बाब खरी आहे का, असे विचारताच कॅगपासून अंकेक्षण अहवाल लपवून ठेवण्यात आला होता असे मुंडे म्हणाले. विभागाला न विचारताच लाखोंच्या रकमा वाटणे, स्वयंपाक्याला प्रकल्प अधिकारी करणे असे गंभीर प्रकार घडले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांची नावे घ्या, त्यांना निलंबित करा, अशी मागणी केली.
त्यावर, चार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा करतानाच प्रधान सचिवांच्या चौकशीत बार्टीचे तत्कालीन
महासंचालक दोषी आढळले तरी सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
तसेच सभागृहाच्या पटलावर निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे ठेवली.

निलंबित केलेले अधिकारी व कर्मचारी

लेखाधिकारी शीलसागर चहांदे, प्रकल्प अधिकारी सोनाली बडोले, ज्योती करवडे,
श्यामराव बन्सोड, उमेश सांगोडे, उपास वाघमारे, नागेश वाहूरवाघ,
तुषार सूर्यवंशी, ओमेश नंदेश्वर, प्रकाश रहांगडाले, प्रकल्प समन्वयक बादल श्रीरामे,
प्रकल्प सहायक हर्षल गावंडे, शिपाई संगीता नुन्हारे यांना निलंबित करण्यात आले.

महिला पोलिसाचे होते सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध, दोघांनी मिळून पतीचा असा काढला काटा

Related Posts