IMPIMP

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

by bali123
MNS On Bhagat Singh Koshyari | mns gajanan kale slams bhagat singh koshyari over his mumbai statement

सरकारसत्ता ऑनलाइन – भाजप पक्षश्रेष्ठीच्या नाराजीनंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर रावत यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 4 नावं असून, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचं नावंही चर्चेत आहे.

रावत यांच्या मंत्रिमंडळात असलेले धनसिंह रावत, लोकसभा खासदार अजय भट, राज्यसभा खासदार अनिल बलुनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अशा चार नावांची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा आहे. या 4 जणांपैकी धनसिंह रावत हेच फक्त सध्या उत्तराखंड विधानसभेचे सदस्य आहेत.

शर्यतीत असणारी 4 नावं
1)
धनसिंह रावत -51 वर्षीय धनसिंह रावत हे त्रिवेंद्र रावत यांच्या मंत्रिमंडळात होते. ते पौरी गरवलमधील श्रीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात पाऊल ठेवण्याआधी ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. धनसिंह हे पायउतार झालेल्या रावत यांच्या वर्तुळातील होते.

2) अजय भट – अजय भट पहिल्यांदा म्हणजे 1996 मध्ये उत्तर विधानसभेवर निवडून आले होते. राणीखेत मतदारसंघातून त्यांनी विजय प्राप्त केला होता. भगतसिंह कोश्यारी यांच्या नेतृ्त्वाखालील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदावर काम केलं होतं. त्यानंतर 2002 आणि 2012 मध्ये ते विधानसभेत निवडून गेले होते. परंतु भाजप विरोधी बाकावर होते. 2007 आणि 2017 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत आला. परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 2019 मध्ये ते लोकसभेत निवडून गेले होते. 2017 च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वीच भट यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतं. परंतु त्यावेळी मात्र ते पराभूत झाले.

3) अनिल बलुनी – राज्यसभेचे खासदार असलेले बलुनी भाजपचे मुख्य प्रवक्तेदेखील आहेत. बलुनी राज्यसभेचे खासदार असले तरी उत्तराखंडमधील प्रत्येक घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. इतकंच नव्हे तर उत्तराखंडमध्ये मागील काही काळात महत्त्वाचे प्रकल्प सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बलुनी यांचे केंद्रीय मंत्र्यांशीही चांगले संबंध आहेत.

4) भगतसिंह कोश्यारी – उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांचं नावही प्रमुख दावेदारांच्या स्पर्धेत आहे. 78 वर्षीय भगतसिंह कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे आणि गोव्याचे राज्यपाल आहेत. आरएसएसचे प्रचारक आणि साधं राहणीमान यासाठी ते ओळखले जातात. 1997 मध्ये कोश्यारी यांना उत्तर प्रदेश विधान परिषदेत पाठवण्यात आलं होतं. उत्तराखंड हे स्वतंत्र राज्य झाल्यानंतर त्यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतं. परंतु ऐनवेळी नित्यानंद स्वामी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. कोश्यारी हे त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. नित्यानंद यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. परंतु त्यांना 5 महिनेच काम करता आलं. कारण विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला. 2002 आणि 2007 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. तसंच प्रदेशाध्यक्षपदीही त्यांनी काम केलं आहे. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता.

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

Related Posts