IMPIMP

Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदासंघातील उमेदवारीबाबत अजित पवार यांनी केले मोठे भाष्य; म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar comment on anjali damania claim about going with bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी अर्ज न
दाखल केल्यामुळे काँग्रेस पक्षाचा विश्वासघात करण्यात आल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. तसेच या प्रकरणाचा अहवाल
काँग्रेसच्या हाय कमांडकडे पाठविण्यात आला असून आता याबाबतचा निर्णय हाय कमांड घेईल. असेही नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते असलेले बाळासाहेब थोरात यांच्यावर सुध्दा टीका केली जात आहे. सत्यजीत तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे तांबेंच्या भूमिकेबाबत बाळासाहेब थोरात यांना अगोदरच माहिती असेल. अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू झाली आहे. त्यावर आज पत्रकारांशी संवाद साधत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल एक मोठे विधान केल्यामुळे एक नवी चर्चा सुरू झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले की, ‘दोन दिवसांपासून काहीतरी वेगळेच कानावर येत होते. त्यामुळे मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो. काहीतरी वेगळं शिजत आहे, माझ्या कानावर आले आहे. तुम्ही काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले होते. मी बाळासाहेब थोरात यांना आदल्या दिवशी पूर्णपणे सांगितले होते. मात्र बाळासाहेब थोरात यांनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू. डॉ. सुधीर तांबे यांचाच अर्ज दाखल होईल, असे मला सांगितले होते.’ असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.
पण फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडींनंतर डॉ. सुधीर तांबे आपण फॉर्म भरणार नसल्याचे सांगितले व त्यांनी त्यांचा मुलगा अर्थात सत्यजीत तांबे यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज या मतदार संघातून दाखल केला.
पण आता काँग्रेसने आपली हक्काची जागा गमावली आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
कारण जरी सत्यजीत तांबे यांचा या जागी विजय झाला तरीदेखील ते अपक्षचं असतील.
त्यामुळे हा महाविकास आघाडीस एक धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, जर सत्यजीत तांबे यांच्याकडून विचारणा करण्यात आली. तर नक्कीच त्यांना पाठींबा देण्याचा विचार करू.
असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar claims told balasaheb thorat about revolt of satyajeet tambe and sudhir tambe for nashik graduate constituency election

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | महाविकास आघाडीतील समन्वयाबद्दल खासदार संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

Pune Crime News | लग्नाअगोदरच शरीर सुखाची मागणी करुन केला विनयभंग

Sidharth Sharma | रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी गेलेल्या ‘या’ भारतीय खेळाडूचे निधन

 

Related Posts