IMPIMP

Ajit Pawar | कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा, अजित पवारांनी सभागृहातच खडसावलं

by nagesh
Ajit Pawar | ...Then economic crisis in the state - Ajit Pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मतदारसंघातील लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात तेव्हा तुम्हाला विधिमंडळाच्या सभागृहात (Legislative Assembly) येण्याची संधी मिळते. तेव्हा आपण कुत्री (Dog), मांजर (Cat), कोंबड्यांचे (Chicken) प्रतिनिधित्व करत नाही, याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहातच खडसावलं. तुम्ही सभागृहात प्राण्याचे आवाज काढता तेव्हा तो या मतदरांचा विश्वासघात आणि अपमान ठरतो. तुम्ही सभागृहात आवाज काढता किंवा टवाळी करता हे पाहून मतदारांना (Voters) काय वाटत असेल याचा विचार आमदारांनी (MLA) करावा, असे वक्तव्य करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहातील नवख्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

विधिमंडळातील सभागृहांच्या वर्तनाविषयी आचारसंहिता (Code of Conduct) निश्चित करण्यासाठी आज विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर सभागृहात आमदारांकडून शिष्टाचार (Manners) सोडून होणाऱ्या वर्तनाला पायबंद घालण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी पहिल्यांदा आमदार होऊन सभागृहात आलो तेव्हा मधुकरराव चौधरी (Madhukarrao Chaudhary) विधानसभेचे अध्यक्ष होते. ते सभागृहात उभे असले की आम्ही दरवाजात थांबायचो. पण हल्ली सभागृहात असे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे पवार यांनी सांगितले.

 

 

कॅबिनेट मंत्र्याशीही पाठीमागे राहून बोलायचो

अजित पवार पुढे म्हणाले, त्यादिवशी एक आमदार माझ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या (CM) आसनावर येऊन बसला. तेव्हा मी त्याला म्हटले की, किमान मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला की इकडे बस. आमच्या काळात आम्ही सभागृहात कॅबिनेट मंत्र्यांशीही (Cabinet Minister) त्यांच्या मागे उभे राहून बोलत होतो. पण आताचे आमदार दर दहा मिनिटांनी एक पत्र आणून देतात. क्रॉसिंगचा नियम तर कोणीच पाळत नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पूर्वी अध्यक्षांना नमस्कार करायचो

एखादा सदस्य बोलत असताना काहीजण गप्पा मारत असतात.
आम्ही पूर्वी सभागृहात येताना अध्यक्षांना नमस्कार करायचो, जातानाही त्यांना नमस्कार करुन सभागृहाबाहेर पडायचो.
परंतु आता कोणीही आमदार झाले की त्यांना आपल्याला सगळं समजतं असे वाटू लागते.
एवढे वर्षे सभागृहात असूनही आम्हाला अजून सर्व समजले नाही तर त्यांना कुठून समजणार, असा सवाल त्यांनी केला.

 

Web Title : Ajit Pawar | deputy chief minister of maharashtra ajit pawar slams bjp mla nitesh rane over aaditya thackeray insult

 

हे देखील वाचा :

LIC Saral Pension Yojana | एलआयसीची जबरदस्त योजना ! एकदाच प्रीमियम भरल्यानंतर आयुष्यभर मिळेल पेन्शन, जाणून घ्या

Sunlight-Immunity | हिवाळ्यात उन्हात शेकल्याने Vitamin D ची कमतरताच नव्हे तर ‘हे’ आजारही दूर होतात; जाणून घ्या

Rohini Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला

 

Related Posts