IMPIMP

अजित पवार 2 दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर, उद्या कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

by pranjalishirish
ajit pawar two day visit pandharpur kalyanrao kales ncp entry fixed

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- पंढरपूर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार Ajit Pawar गुरुवारी दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर येणार असून काही ठिकाणी प्रचार सभा देखील घेणार आहेत. याच दरम्यान भाजपचे नेते आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

फक्त शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा देण्याची जबाबदारी आहे का ?

अजित पवारांच्या Ajit Pawar उपस्थितीत कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले आहे. तर काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात कल्याणराव काळे यांच्यासह आणखी काही प्रेवश व मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याने अजित पवारांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Pravin Darekar : ‘मुख्यमंत्र्यांचं मौन म्हणजे खुर्चीसाठी शांत बसणं अन्…’

पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून सर्वच उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रावादीकडून यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पक्ष निरिक्षक सुरेश घुले, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील आदी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. आता त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत.

आ. शिवेंद्रराजे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘Lockdown लावून प्रशासनाकडून मोगलाई’

आपल्या दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यात अजित पवार अनेकांना पक्षात प्रवेश देणार आहेत. तसचे पक्षातील नाराज असलेल्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना प्रचारात सक्रिय करणार आहेत. पंढरपूर, मंगळवेढा शहरांसह काही प्रमुख मोठ्या गावात प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका अजित पवार घेणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Coronavirus Updates : पुण्यातील परिस्थिती आणखी बिकट, मनपाने मागितली लष्कराची मदत

गुरुवारी (दि.8) सकाळी 9 वाजता अजित पवार पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत. श्रेयस पॅलेस मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कल्याणराव काळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यादृष्टीने समर्थकांनी तयारी सुरु केली आहे.

Read More : 

Coronavirus Cases India : देशात पहिल्यांदा एका दिवसात नोंदली गेली संसर्गाची 1.07 लाख प्रकरणे, केंद्राने लोकांना केले ‘हे’ आवाहन

Mini Lockdown : ‘सरकारने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली’, निर्बंधावर राऊतांचे ‘कडक’ मत

चित्रा वाघ-रुपाली चाकणकर यांच्यात रंगला ‘कलगीतुरा’ !

परमबीर सिंग NIA च्या कार्यालयात ! सचिन वाझे, अँटिलिया प्रकरणी जबाब नोंदवणार

‘मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांवर नियंत्रण नाही, आता राजीनाम्यासाठी रांग लागेल’, केंद्रीय मंत्र्याचा दावा

‘त्या’ वक्तव्यावरुन संजय निरुपम यांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले -‘बहिरा नाचे आपन ताल…’

‘खा. प्रताप पाटील-चिखलीकरांची माणसे निवडून देऊ नका, भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल’; भाजपमधील गटबाजी उघड

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज शरद पवारांची भेट घेणार

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे ‘स्टार’ प्रचारक कोरोनाबाधित

Related Posts