IMPIMP

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

by pranjalishirish
anand shindes reply devendra fadnavis says pawars government it will not fall easily

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करताना सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर प्रसिध्द गायक आनंद शिंदे  Anand Shinde यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला आहे. ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाही,’ असा टोला शिंदे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता लगावला आहे.

Pandharpur : राज्यात ‘करेक्ट’ कार्यक्रम करुन दाखवतो – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी आलेल्या आनंद शिंदे Anand Shinde यांनी गाण्याच्या माध्यमातून मतदारांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले. एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का, असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असे फडणवीस यांनी म्हटले होते. फडणवीस हे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे,नंदेश्वर, डोंगरगाव येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आले असताना हे विधान केले होते. दरम्यान सरकार पडणार,  सरकार अस्थिर करणार अशी भाषणे विरोधी पक्षाला करावीच लागतात. हे जेंव्हा सरकार पाडतील तेंव्हा त्यांचे अभिनंदन करून असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts