IMPIMP

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी

by nagesh
Ramdas Kadam | Will Shiv Sena mediate in the dispute between Anil Parab and Ramdas Kadam? Steps to go to the legislature?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Anil Parab | नुकतंच सकाळी वाशिमच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदार भावना गवळी (MP Bhavana Gavali) यांच्या संबंधित असणाऱ्या काही संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकली आहे. जवळपास 5 संस्थांवर ईडीने छापेमारी केलीय. यांनतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मागे ईडीचा ससेमिरा मागे लागला आहे. आजच परब यांच्या संबंधित काही मालमत्तांवर ईडीने धाड (Raid) टाकली आहे. साधारण अनिल परब (Anil Parab) यांच्या संबंधित असणाऱ्या 3 मालमत्तांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती ED ने दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मागील काही महिन्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील मंत्री, नेत्यांच्या मागे ED पथकांचा ससेमिरा मागे असल्याचं पाहायला मिळत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाबाबत (Money laundering case) ही धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या 3 मालमत्तांवर कारवाई करण्यात आल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ED) सांगितलं आहे.
दरम्यान, कालच अनिल परब यांना ED ने हजर राहण्याची नोटिस पाठवली आहे.
यावरून राज्यात सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

 

अनिल परब (Anil Parab) यांना उद्याच्या मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याच्या सूचना ED कडून देण्यात आल्या होत्या.
100 कोटी वसुली आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने NIA कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना समन्स पाठविण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.
परंतु, या दोन्ही एकच वेळेने राज्यातील राजकारणात चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्याने मंत्री अनिल परब अडचणीत अडकले होते.
त्यातच परब यांना कालच सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले.
आणि आज छापेमारी करण्यात आलीय.

 

Web Title : Anil Parab | ed raids shiv sena leader transport minister anil parabs properties

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 84 नवीन रुग्ण, 227 जणांना डिस्चार्ज

PMSYM | 2 रुपये खर्च करून ज्येष्ठांना होऊ शकतो मोठा लाभ ! दरमहिना खात्यात येईल इतकी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

Vasu Paranjape | भारताने ‘द्रोणाचार्य’ गमावला; जेष्ठ प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

 

Related Posts