IMPIMP

Bachchu Kadu | ‘राज, उद्धव यांचं सांगू नका, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो’ – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

by nagesh
Bacchu Kadu | after two and a half years as a minister bachu kadus answer revealed his displeasure once again

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  कालच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 11 वी प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली सामान्य प्रवेश परीक्षा (CET) रद्द ठरवण्याचा आदेश दिला. यावरून राज्य सरकारला (Maharashtra Government) एक दणका हाय कोर्टाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 11 वी सीईटीच्या (CET) मुद्यावर हायकोर्टानं हस्तक्षेप केला. न्यायालयाचा असा निर्णय येईल, असं वाटलं नव्हतं, असे ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं खासगी शाळेत शिकली याबाबत विचारणा केली असता त्यांच्या मुलांचे मला सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय, असं बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

काय म्हणाले बच्चू कडू?

11 वीची CET रद्द करण्याचा निर्णय झाला असला तरी शिक्षण कुठंही थांबणार नाही. 11 वीच्या प्रवेशांना
कुठेही अडचण येणार नाही, गरज पडल्यास जागांची संख्या वाढवू. तर, एकाही मुलाला प्रवेश मिळला नाही
असं होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी 11 वीच्या सीईटीचे (CET) शुल्क भरलं असेल ते त्याला परत मिळेल, तो
त्याचा अधिकार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu) यांनी
पालकांनी शासकीय शाळांना पालकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

 

 

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘पालकांनी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा बोगस आहेत, असं
समजू नये. तिथं शिकणारी मुलं शिकली नाहीत का? अधिकारी झाली नाहीत का?, असा सवाल देखील
त्यांनी पालकांना केला आहे. पालकांनी अभियान म्हणून पाहिले पाहिजे आणि सरकारी शाळांना सहकार्य
केले पाहिजे. खासगी संस्थांची मक्तेदारी वाढली आहे. ते कमी झाली पाहिजे, यासाठी पालकांनी भूमिका
बदलली पाहिजे,

 

 

दरम्यान, 50 टक्केच्या वर मुलं शासकीय शाळेत शिकत आहेत. फक्त ब्रेकिंग दाखवतात, माध्यमातून
सरकारी शाळांबाबत कधी चांगलं दाखवलं गेलं नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे
(Uddhav Thackeray) यांची मुलं खासगी शाळेत शिकली याबाबत विचारलं असता त्यांच्या मुलांचे मला
सांगू नका, माझा मुलगा नगरपरिषदेच्या शाळेत शिकतोय, असं बच्चू कडू (Minister of State
Bachchu Kadu) यांनी म्हटलं आहे.

 

आपण शाळा सुरू करण्यास प्रयत्न करतोय. कोरोना कधी जाईल हे सांगणारा भविष्यकार ही
शोधतोय तो मिळत नाही, आपण ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवतोय, पर्याय सांगा, बैठका घेऊन
आता आम्हाला वीट आलाय. ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम आहेत, श्रीमंताची मुलं शिकली
गरिबाची राहून गेली. विद्यार्थ्यांमध्ये मोठी विषमता निर्माण झालीय जगताला सगळ्यात मोठा
मूर्खपणा, जो आम्ही केला, असे ते म्हणाले, दरम्यान, महाराष्ट्र वगळता बाकीच्या राज्यांची शिक्षणांची
बेकार परिस्थिती आहे. आपण विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. तर, अन्य राज्यांनी मुलांच्या
आरोग्याचा विचार न करता शाळा सुर करण्याला प्राधान्य दिले, असं बच्चू कडू (Minister of
State Bachchu Kadu) यांनी सांगितलं आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title : bacchu kadu appeal to parents for prefer government schools said her son learn in municipal council school

 

हे देखील वाचा :

Pune News | 82.34 कोटीचे बेकायदेशीर मालमत्ता प्रकरण ! निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Neeraj Chopra | नीरज चोप्रासाठी केलेल्या ट्वीटमुळे ‘बिग बीं चांगलेच चर्चेत, ‘या’मुळे होतायेत ट्रोल

Work From Home | ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात 25 % पर्यंत होणार कपात, जाणून घ्या

 

Related Posts