IMPIMP

Balasaheb Thorat | महसूल मंत्रिपद न मिळाल्याची वडेट्टीवारींनी व्यक्त केली खदखद; बाळासाहेब थोरातांनी दिला ‘हा’ सल्ला

by bali123
Balasaheb Thorat | Vijay Wadettiwar  should wait a bit he will get a chance in the future says balasaheb thorat

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Balasaheb Thorat | ओबीसी (OBC) असल्यामुळे महसूल खाते (Revenue Minister) मिळाले नाही, अशी खंत मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Congress leader Vijay Wadettiwar) यांनी पुण्यात (Pune) बोलून दाखवली. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi government) खदखद पुन्हा समोर आली. यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Senior Congress leader Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पहावी, असा सबुरीचा सल्ला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिला आहे.

काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष (Congress secular party)

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले, काँग्रेस (Congress) बिलकुल जातीयवादी किंवा धर्मवादी पक्ष नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा धर्मनिरपेक्ष पक्ष (Congress secular party) आहे. वडेट्टीवार यांना वेगळं काहीतरी म्हणायचं असेल, आपल्या सगळ्यांचा गैरसमज झाला असेल, वडेट्टीवारांचं (Vijay Wadettiwar) वय पाहिलं तर खूप मोठी संधी पुढच्या काळात मिळणार आहे. त्याकरता त्यांना थोडीशी वाट पहावी लागेल, असे थोरात यांनी स्पष्ट केलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

ओबीसी (OBC) म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याची खंत अनेकांची आहे.
परंतु या अन्यायाला जाहीर वाचाही फोडता येत नाही.
कारण, तसे झाल्यास या ओबीसी (OBC) नेत्यांचे पंख पक्षात कापले जातात, असेही दुखणे आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांची खंत तर जगजाहीर आहे.
ओबीसी नसतो तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते.
कदाचीत ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली.
विरोधी पक्ष नेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो.
मला वाटलं महसूल खातं (Revenue Minister) मिळेल, पण हे खातं भेटले.
कारण मी ओबीसी आहे ना, असे विजय वडेट्टीवार म्हणाले होते.

Web Titel :- Balasaheb Thorat | Vijay Wadettiwar  should wait a bit he will get a chance in the future says balasaheb thorat

Related Posts