IMPIMP

‘नवाब मलिक सच्चे मुसलमान नाहीत, कारण…; भाजपच्या आचार्य तुषार भोसलेंची टीका (Video)

by nagesh
bjp acharya tushar bhosale on ncp nawab malik corona vaccination remdesivir

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : ठाकरे सरकारवर होणाऱ्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक nawab malik यांच्याकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी टीकास्त्र सोडले. ‘रमजानसारख्या पवित्र महिन्याचे पावित्र्य घालवण्याचे काम नवाब मलिक nawab malik यांनी सत्तेच्या नशेमध्ये केले असल्याचे मला वाटते. त्यामुळे एक तर ते सच्चे मुसलमान नाहीत किंवा अल्लाहचे गुनाहगार आहेत. कारण त्यांनी रोजाही तोडला आहे’, असे भोसले म्हणाले.

Chandrakant Patil : ‘अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, झेपत नसेल तर पद सोडाव’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या नवाब मलिक nawab malik यांच्यावर भाजपकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता भाजपच्या तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, ‘रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट काम करायचे नसते आणि खोटे बोलायचे नसते हे लहान मुलालाही कळते. मात्र, आजच्या महाभयानक अशा संकटात नवाब मलिक यांच्यासारखे लोक खोटे बोलून समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच लोकांनी त्यांना उघडं पाडले आहे. मला वाटते की, सत्तेच्या नशेमध्ये रमजानसारख्या पवित्र महिन्याचे पावित्र्य घालवण्याचे काम नवाब मलिक यांनी केले आहे. म्हणून एक तर ते सच्चे मुसलमान नाहीत किंवा अल्लाहचे गुनाहगार आहेत. कारण त्यांनी रोजा सुद्ध तोडला आहे’.

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

गुन्हा दाखल करण्याची मागणी
खोटे आरोप करून केंद्र सरकारबाबत असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल नवाब मलिक nawab malik यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि संसर्गजन्य कायद्याअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे यापूर्वीच केली आहे.

Also Read :

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

Related Posts