IMPIMP

Atul Bhatkhalkar : ‘शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही पत्राची अपेक्षा’

by nagesh
bjp atul bhatkhalkar criticises sharad pawar over letter cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांना खिळ बसली आहे. हॉटेल व्यावसायिक आणि बार चालकांनाही याची झळ बसली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवारांची बार मालकांसाठी कळकळ पाहून कंठ दाटून आला, शेतकऱ्यांसाठीही अशाच पत्राची अपेक्षा म्हणत भातखळकर यांनी टीकास्त्र सोडल आहे.

मर्डर केसमध्ये ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमारचे नाव आले समोर, पोलिसांकडून कुस्तीपटूच्या घरावर छापा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ का दिली नाही?, शिवसेनेचा ‘सामना’तुन सवाल

शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. 100 कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे, हे मी नमूद करू इच्छितो, अशी टीका भातखळकरांनी Atul Bhatkhalkar ट्विटमधून केली आहे. शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला, तर थोड तिथेही लक्ष द्या, मराठा समाज मोठ्या आशेने आपल्याकडे पाहतोय, असे भातखळकर यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Also Read :

‘महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना कंट्रोलमध्ये येणार नाही’

भाजपकडून माजी खा. संजय काकडे यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

ठाकरे सरकारची वचनपूर्ती, 9 लाख नोंदणीकृत कामगारांच्या खात्यात 137.61 कोटी रुपये जमा

Related Posts

Leave a Comment