IMPIMP

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

by pranjalishirish
bjp leader chandrakant patil slams maharashtra government over parambir singh allegations on anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  यांनी भाष्य केले.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर आता हे प्रकरण सीबीआयकडे गेले आहे. त्यानंतर भाजपने या निर्णयाचे स्वागत केले आहे. चंद्रकांत पाटील Chandrakant Patil  म्हणाले, परमबीर सिंग यांनी केलेले आरोप स्पष्ट आहेत. त्यावरून माध्यमांमध्येही अनेकदा स्पष्टीकरण दिले गेले आहे. इयत्ता आठवीतील विद्यार्थीही सांगेल की सरकार हे प्रकरण दाबत आहे. आता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीची निर्णय दिला आहे तर अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच शरद पवार साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकारणातील अनुभव पाहता एखाद्या मंत्र्यावर सीबीआय चौकशीचे आदेश असताना ते राजीनामा घेतील असा विश्वास आम्हाला आहे. मात्र, त्यांनी असे केले नाही तर महाराष्ट्राची जनता सर्वकाही पाहत आहे.

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

दरम्यान, अनिल देशमुख यांचा राजीनामा शरद पवार हे घेतील असा विश्वास आहे. त्यांनी राजीनामा घेतला नाहीतर जनताच सर्वकाही पाहील. राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आता कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Related Posts