IMPIMP

संजय राऊतांच्या आवाहनानंतर गडकरींचा बेळगाव दौरा रद्द? देवेंद्र फडणवीस जाणार प्रचाराला

by Team Deccan Express
bjp leader nitin gadkari belgaum bypoll rally cancels after sanjay raut statement

बेळगाव : वृत्तसंस्था – बेळगावमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होत असून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत sanjay raut यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारासाठी बेळगावमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी नितीन गडकरी यांच्या बेळगाव दौऱ्यावर बोलताना संजय राऊत sanjay raut म्हणाले होते, बेळगावातील मराठी बांधवांना मदत करता येत नसेल तर किमान मराठी मतदारांमध्ये तोडफोड करु नका. संजय राऊत यांच्या आवाहनानंतर नितीन गडकरी यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

भाजप नेते नितीन गडकरी यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, नितीन गडकरी यांच्या ऐवजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (गुरुवार) भाजपच्या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर काँग्रेसने आमदार सतीश जारकीहोळी यांनी रिंगणात उतरवले आहे.

अजित पवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला, म्हणाले -‘आपला नाद कुणी करायचा नाही, सरकार पाडणं हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही’

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून के.पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी होऊ नये यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत sanjay raut यांनी बेळगाव येथे प्रचारसभा घेतली होती.

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे बेळगावमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असे राऊत sanjay raut यांनी म्हटले होते.

चंद्राकांत पाटलांचा दावा, म्हणाले- ‘पुढील महिन्यात ‘या’ तारखेला राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग’

राऊत पुढे म्हणाले, या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसने आपली ताकद लावली तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण ते राष्ट्रीय पक्ष आहेत. मात्र, महाराष्ट्रातील नेत्यांनी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, या ठिकाणी येऊन मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये. कोणीही असतील, मग ते काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे, असे स्पष्टपणे राऊतांनी सांगितले होते.

Also Read :

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

Related Posts