IMPIMP

भाजप नेत्याचा सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री ठाकरे वाझेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?’

by bali123
bjp leader sanjay kute slams thackeray govt over sachin vaze issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास एनआयएकडून सुरु आहे. या प्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात आता भाजप नेते संजय कुटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री वाझे यांच्यासाठी इतक्या बैठका का घेत आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांसाठी बैठकाचा असाच धडाका कधी लावणार, अशी विचारणाही कुटे यांनी केली आहे.

संजय कुटे यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. इतरवेळी दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरूवात करणारे मुख्यमंत्री गेल्या 3 दिवसांपासून बैठकामागून बैठका घेत आहेत. ही आश्चर्यजनक बाब आहे. वाझे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार, असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याचे कुटे यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत, असे कुटे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार किती दुटप्पी आहे.
विधानसभेत वीज बील वसुलीस स्थगिती दिल्याचे आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आल्याचे ते म्हणाले.

‘देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? गुन्ह्यात सहभागी होऊ नका’, काँग्रेस नेत्याचं विधान

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Related Posts