IMPIMP

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’

by bali123
Pandharpur : Sharad Pawar will decide the candidate

नवी दिल्ली/कोलकाता : सरकारसत्ता ऑनलाइन – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. येथे भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढत होत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद  पवारांनी sharad pawar यापैकी तृणमूलच्या बाजूने उभे राहण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी थेट पवारांना पत्र लिहिल आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करू नका, असे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणे टाळा असे भट्टाचार्य यांनी पत्रात नमूद केले आहे.

पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरू असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षाने ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असे विधान पवारांनी केले होते. त्यानंतर लगेचच पश्चिम बंगालमधल्या काँग्रेस नेत्याने पवारांना sharad pawar पत्र पाठवले आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढणाऱ्या ममतांना समर्थन आणि महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत वाटेकरी, अशी भूमिका घेऊ नका, असा अप्रत्यक्ष इशारा काँग्रेसने पवारांना दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान देशात तिसरी आघाडी तयार करण्याबद्दलचे विधान शरद पवार यांनी केले होते. देशात तिसरी आघाडी तयार करण्याची गरज आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांशी बोलणी सुरू असल्याचे पवार म्हणाले होते. आपल्या भूमिकेला सीपीआयएमचे प्रमुख सीताराम येचुरी यांनी पाठिंबा दिल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

महादेव जानकर 3 दिवसांपासून बारामतीत; लोकसभा लढवण्याचे दिले ‘संकेत’?

Mumbai : पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Related Posts