IMPIMP

‘देवेंद्र फडणवीस अपराध्यांना पाठीशी का घालतायेत? गुन्ह्यात सहभागी होऊ नका’, काँग्रेस नेत्याचं विधान

by bali123
why do devendra fadnavis support criminals question congress leader

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडून एनआयए (NIA) च्या टीमनं जी मर्सिडीज गाडी जप्त केली आहे त्या गाडी सोबत भाजप नेत्याचा संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला होता. सचिन सावंत यांनी पुरावे देत फोटोही सोशलवर शेअर केले होते. यामुळं एकच खळबळ उडाली होती. एनआयएनं जप्त केलेल्या या गाडीतनून 17 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन यांनी प्रवास केला होता असं म्हटलं जात आहे. याबद्दल आता भाजप नेत्यांनी खुलासा करावा अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. सीडीआर कोणी दिला हे न सांगून आणि सीडीआर संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना न देऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अपराध्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप करत या गुन्ह्यात फडणवीसांनी सहभागी होऊ नये अशी विनंती देखील सावंत यांनी केली आहे.

‘यातून भाजप नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे’
सचिन सावंत म्हणाले, हिरेन मृत्यू प्रकरणातून सरकार अस्थिर करण्याचा राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी भाजप नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप करत सुटले आहेत. यातून भाजप नेत्यांचा बेजबाबदारपणा पूर्णपणे दिसून आला आहे. अँटिलिया समोर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडण्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजप नेते बेफामपणे कोणत्याही पुराव्याशिवाय महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहे असंही सावंत म्हणाले आहेत.

‘दोषीला पाठीशी घालण्याचा फडणवीसांचा उद्देश आहे का ?’
पुढं बोलताना सावंत म्हणाले, या प्रकरणातील सीडीआर आपल्याकडे आहे असं देवेंद्र फडणवीस devendra fadnavis यांनी विधीमंडळात जाहीर केलं होतं. सीडीआर मिळवणं हा एक अपराध आहे आणि स्वत: वकिल तसेच माजी गृहमंत्री राहिलेल्या फडणवीस यांना याची पूर्ण माहिती आहे. मात्र सदर सीडीआर त्यांनी अद्यापही तपास यंत्रणांना दिला नाही. हिरेन प्रकरणातील दोषींना पकडण्यासाठी सदर माहितीचा उपयोग झाला असता असं सांगत यातून दोषीला पाठीशी घालण्याचा त्यांचा उद्देश आहे का ? असा सवालही सावंत यांनी केला आहे.

‘ते अपराधी अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत, गुन्ह्यात सहभागी होऊ नका’
सावंत असंही म्हणाले की, कर्नाटक उच्च न्यायालयानं 15 मार्च 2021 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालात न्यायालयानं म्हटलं आहे की, एखाद्या आरोपीची वैयक्तिक माहिती त्यात सीडीआर आला, न्यायालयाच्या परवानगीशिवाय तिसऱ्या व्यक्तीला कोणीही अधिकाऱ्यानं दिली तर त्याला दोषी ठरवलं जाईल. फडणवीसांना ती माहिती कोणी दिली हे न सांगून ते अशा अपराधी अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत. त्यामुळं गुन्ह्यात सहभागी होऊ नका अशी विनंती सावंत यांनी केली.

‘बेछूटपणे आरोप करणाऱ्या भाजपनं या कनेक्शनबाब स्पष्टीकरण द्यावं’
17 फेब्रुवारीला मनसुख हिरेन ज्या मर्सिडिज गाडीतून फिरले ती गाडी एनआयए नं जप्त केली आहे. सदर गाडी सोबत ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याचा फोटो आहे. बेछूटपणे आरोप करणाऱ्या भाजपनं या कनेक्शनबाब स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील सावंत यांनी केली आहे.

काँग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र पाठवून आवाहन, म्हणाले – ‘पवार साहेब, प्रचाराला येऊ नका, लोकांचा गोंधळ उडेल’

Mumbai : पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Related Posts