IMPIMP

BJP-MNS Alliance | नवीन राजकीय समीकरण ? कुडाळमध्ये भाजप-मनसे युती, तर पुण्यात मनसेचे शिष्टमंडळ भाजप नेत्यांच्या भेटीला

by nagesh
BJP-MNS Alliance | bjp mns alliance in kundal nagarpanchayat elections both party leaders meet in pune also

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP-MNS Alliance | आगमी महापालिका निवडणुकीमध्ये (Maharashtra Municipal Elections) भाजप-मनसे युती (BJP-MNS Alliance) होणार का यासंदर्भातील प्रश्न आतापर्यंत अनेकदा उपस्थित करण्यात आले. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते अनेकदा एकमेकांच्या भेटी घेत असले तरी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. परप्रांतीयांसंदर्भातील मनसेची भूमिका पटणारी नसल्याचे भाजपच्या नेतृत्वाने अनेकवेळा म्हटले आहे. या दोन पक्षांच्या युतीबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये (Sindhudurg District) या दोन्ही पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. ही युती कुडाळ नगरपंचायतीच्या (Kudal Nagar Panchayat) निवडणुकीसाठी झाली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील मनसेचे (Pune MNS) नेते भाजपच्या नेत्यांना भेटल्याने पुण्यात देखील मनसे-भाजप युती (Pune MNS) होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कुडाळ नगरपंचायतच्या उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठिंबा दिला आहे. तर एका जागेवर भाजपने मनसेला पाठिंबा दिला आहे. याबाबत स्थानिक पातळीवरील युतीची घोषणा आज भाजप कार्यालयात भाजप आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.

 

दुसरीकडे पुण्यात आज शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) शिष्टमंडळाने भाजपच्या नवीन शहर कार्यालयाला (BJP New City Office) भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी भेटीचे आमंत्रण दिले होते. परस्परांना येत्या महापालिका नवडणुकीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या, असं पुणे मनसेच्या ट्विटर अकाउंटवरुन काही फोटो ट्विट करत सांगण्यात आलेय. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची भेट झाल्याने पुण्यात नवीन राजकीय समीकरणाची ही नांदी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (BJP-MNS Alliance)

 

यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More), महिला शहराध्यक्षा वनिता वागसकर (Vanita Wagaskar), राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते (Ganesh Satpute), रणजित शिरोळे (Ranjit Shirole) व बाळा शेडगे, सरचिटणीस किशोर शिंदे व हेमंत संभूस, राज्य सचिव व प्रवक्ते योगेश खैरे, महिला जिल्हाध्यक्षा सुशिला नेटके, मनपा गटनेते साईनाथ बाबर, पर्यावरण सेनेचे शहराध्यक्ष नितीन जगताप, माध्यम प्रमुख संतोष पाटील उपस्थित होते.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  BJP-MNS Alliance | bjp mns alliance in kundal nagarpanchayat elections both party leaders meet in pune also

 

हे देखील वाचा :

Homemade Antifungal Remedies | ‘या’ घरगुती उपायांनी ‘फंगल इंफेक्शन’पासून मुक्ती मिळू शकते; जाणून घ्या

Mumbai-Pune Expressway | केवळ सर्दीच्या गोळीमुळं मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अभिनेत्याचा झाला अपघात, जाणून घ्या प्रकरण

Supreme Court On Dowry | सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय ! सासरकडून पैसा किंवा मागितले जाणारे कोणतेही सामान हुंडा मानला जाईल

 

Related Posts