IMPIMP

प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला टोला, म्हणाले – ‘जास्त बोलण्यापेक्षा कृती जास्त करा’

by Team Deccan Express
bjp pravin darekar on maharashtra government central government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक रुग्णालयामध्ये काही तास पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपण केंद्राच्या पाया पडायला तयार असल्याचे म्हटले आहे. केंद्राने मदत करावी अशी मागणी टोपे यांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगताना पहायला मिळत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर pravin darekar यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्य सरकारला काहीही झालं तरी केंद्र सरकार आठवतं असा टोला लगावला आहे.

Social Media Reactions : ‘मुख्यमंत्री साहेब, 2 तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’

प्रवीण दरेकर pravin darekar यांनी मुलाखतीदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्य सरकारचा केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिवाय एक दिवस जात नाही. राज्य सरकारने कोरोना काळात जनेतेसाठी काय केले याचे आकडे समोर आले आहेत. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना केंद्र सरकारने राज्याला दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचे घोषीत केले आहे. हा ऑक्सिजनचा साठा आणण्याची जबाबदारी कोणाची आहे ? ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकार 32 टँकर उपलब्ध करु शकत नाही. वाहतुकीसाठी विशेष विमानांची व्यवस्था का केली जात नाही ? असे प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारले आहेत.

… म्हणूनच FDA चे (आयुक्त अभिमन्यू काळेंच्या नियुक्तीला अजित पवारांचा होता विरोध

जास्त बोलण्यापेक्षा कृती जास्त करा
केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. यावरुन आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. जास्त बोलण्यापेक्षा कृती जास्त करा असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे 36 हजार इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगत आहेत. नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड 50 हजार तर संजय राऊत हे 80 हजार इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगत आहेत. आम्ही ब्रुक फार्मा कंपनीकडून इंजेक्शन उपलब्ध करुन देत होतो. तर त्यांनी कंपनीच्या मालकालाच आत टाकलं, अशी टीका करत साठा कुठे आहे ? अशी विचारणा दरेकर यांनी केली. आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारला निशाणा बनवण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम सुरु असल्याची टीका प्रवीण दरेकर pravin darekar यांनी केली.

सुट्टीवर गावाकडे आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे माओवाद्यांनी केले अपहरण

केंद्राकडून पहिल्यापासून झुकते माप
केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून राज्याला झुकते माप दिले आहे. मात्र, राज्य सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. केंद्रावर टीका करण्याअगोदर राज्य सरकारने काय नियोजन केले ते सांगावे. आपल्याला जमत नाही म्हणून केंद्रावर ढकलणं चूकीचं आहे, अशी टीका दरेकर pravin darekar यांनी केली.

Also Read :

‘तत्वज्ञान सांगणार्‍या अमोल कोल्हेंनी ते ज्ञानामृत आधी सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे’

फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

Related Posts