IMPIMP

गरज असेल, तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल : मुंबई हाय कोर्ट

by bali123
bombay high court directs reply thackeray govt over z plus security adar poonawalla

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनकाही दिवसापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी आपल्या जीवाला धोका असून, काही जणांकडून धमक्या येत असल्याचा मोठा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर त्यांना वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली. मात्र, पूनावाला (Adar Poonawalla) यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पूनावाला (Adar Poonawalla) या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या व्यक्ती आहेत. याचिकाकर्त्यांकडून मांडण्यात येणाऱ्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाऊ शकते. तसेच भारताच्या असलेल्या प्रतिमेबाबत विचार करूनच बाजू मांडावी, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Video : जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. अदर पूनावाला (Adar Poonawalla) देशाची खूप मोठी सेवा करत आहेत. उत्तम काम करत आहेत. मात्र, आमच्या माहितीनुसार, अदर पूनावाला यांना यापूर्वीच वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे. तरीही याचिकाकर्ते झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करत आहेत. गरज असेल, तर राज्य सरकार आणखी सुरक्षा देईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पूनावाला यांना मिळत असलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून तपास करण्याचे निर्देश द्यावेत,अशी मागणी याचिकेत केली आहे. कोरोना लसींची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला असुरक्षित वाटत असेल, तर त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो, असा दावा या याचिकेत केला आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 1 जून रोजी होणार आहे.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts