IMPIMP

प्रियांका गांधींच्या जातीयवादी राजकारणामुळं ‘यूपी’मध्ये काँग्रेस पुनरुज्जीवन करेल का ?

by sikandershaikh
priyanka gandhi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (priyanka gandhi) सातत्याने जाती आणि विशेष वर्गाच्या दृष्टीने राजकारणाची तयारी करण्यात व्यस्त आहेत. भाजपही उत्तर प्रदेशवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. भाजप नेते हे एक आव्हान मानत आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी (priyanka gandhi) सातत्याने चर्चेत आहे. प्रियांका गांधी यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला उभारी मिळावी, यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसारच आता उत्तर प्रदेशात पक्षाला पुन्हा नवी ऊर्जा देण्याचा काम सुरु आहे. आता या राज्यात जाती आणि वर्ग, या दोन्ही गोष्टी सांभाळत राजकारण करू इच्छितात. काँग्रेसकडून जाती आणि वर्गाला भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्यांना आव्हान देण्याची तयारी केली जात आहे.

नवी धार्मिक प्रतिमा

काँग्रेस नेत्यांची उदार धार्मिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरु आहेत. हेच कारण आहे, की संगम स्नान, मंदिर यात्रा इतकेच नाही तर प्रियांकांची सूफी समाधीवर हजेरी. त्यांच्या या कामांना मोठ्या राजकीय स्तरावर पाहिले जात आहे. भाजपही यामुळे मोठ्या प्रमाणात चिंतेत असून, सातत्याने या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे.

लोकसभेत काँग्रेसला कमी जागा

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी अत्यंत कमी जागांवर विजय झाला होता. पण आता त्यानंतर पक्षाकडून याच राज्यावर लक्ष केंद्रित केले जात असून, प्रियांका गांधींच्या खांद्यावर याची कमान सोपवण्यात आली आहे.

Related Posts