IMPIMP

भाजपची मागणी : एक कोटी लोकांना 5 हजार द्या आणि मग Lockdown करा

by pranjalishirish
chadrakant patil slams uddhav thackeray government says pay 5000 to needy before lockdown

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – सध्या महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. राजकीय क्षेत्रात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण खूपच तापले आहे. “आपल्या राज्यात सर्वाधिक कोरोना आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. या लॉकडाऊनला आमचा विरोध असणार असून लॉकडाउन हा पर्याय नाही. एक वर्ष लोकं कसे जगले हे मातोश्रीमध्ये राहून समजणार नाही,” असे बोलत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे  Uddhav Thackeray यांच्यावर टीका केली आहे. तसेच “पूर्वी राजा जसा कपडे बदलून वस्त्यांमध्ये फिरायचा तसं फिरावं लागेल. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरला की तुमच्या सोबत ताफा असेल. त्यामुळे लोक तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार नाहीत,” असे बोलत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊन जारी करण्याआधी हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार देण्याची मागणी केली आहे.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

याचा बरोबर चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे Uddhav Thackeray  यांच्यावरसुद्धा टीका केली आहे. सध्या राज्यामध्ये रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यावरून त्यांनी “आता नाईट कर्फ्यु लागू केला. ते आम्हाला मान्य आहे. रात्री कोणाला फिरायचे असते. ज्यांना फिरायचं असते ते तुमच्या सोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवे असते. सर्व सामन्यांना नाईट लाईफ नको असते, त्यांना सातच्या आत घरात चालतं,” असे म्हणत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

तसेच “दोन-तीन महिन्यात सर्व पूर्वपदावर येत होते. आता लॉकडाउन करणे योग्य ठरणार नाही. तसे करायचे झाल्यास, राज्य सरकारने हातावर पोट असलेल्या साधारण एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत,” अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

Also Read

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts