IMPIMP

Chandrakant Patil । चंद्रकांत पाटलांचं छगन भुजबळांना जाहीर आव्हान, म्हणाले… (व्हिडीओ)

by bali123
Chandrakant Patil । chandrakant patil gave a open challenge to chhagan minister and ncp leader bhujbal said

कोल्हापूर  : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (Political reservation of OBC) मुद्यावरून आज राज्यभर भाजपच्या (BJP) वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात आंदोलन (Kolhapur movement) करण्यात आले. या आंदोलनावरून सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस टीकाटिपणी करताना दिसत आहेत. तर कोल्हापुरातील आंदोलनावेळी चंद्रकांत पाटील यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यावेळी चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी बोलत होते. (Chandrakant Patil । Chandrakant Patil gave a public challenge to Chhagan Bhujbal)

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, ‘जोपर्यंत राज्य सरकार इम्पेरिकल डेटा (Imperial data) सादर करत नाही तोवर ओबीसी समाजाला (OBC society) राजकीय आरक्षण मिळणार नाही.
माझं भुजबळांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी कोल्हापुरच्या बिंदू चौकात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व भुजबळ यांचं आमनेसामने होऊ द्या, ज्यात कोण कुणाला फसवतं ते कळू द्या.
ओबीसी समजाला हे सांगावं की हे आरक्षण कुणामुळे गेलंलं आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
तर ओबीसी समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी एकदा काय,
हजार वेळा अटक होण्यास तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे पन्नास टक्क्यांच्या खालचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यामुळे प्रचंड सामाजिक तणाव निर्माण झाला आहे.
ओबीसींचे हे राजकीय आरक्षण जोपर्यंत पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत भाजपा रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. ये तो बस अंगडाई है, आगे और लढाई है!”
असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

इम्पेरिकल डेटाशी (Imperial data) केंद्राचा काय संबंध?

चंद्रकांत पाटील यांनी इम्पेरिकल डेटाशीसंबंधित सांगितले आहे की, पंधरा वेळेला सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला हे म्हटलं की, इम्पेरिकल डाटा (Imperial data) द्या.
यांना बहुतेक हा इंग्रजी शब्द असल्याने फरकच कळत नाही. हे म्हणतात केंद्राने दिला नाही.
इम्पेरिकल डाटा हा राज्याचा मागास आयोगाने तयार करण्याचा डाटा आहे.
काय संबंध याच्याशी केंद्राचा? मराठा समाजाला आरक्षण मिळवताना जसं गायकवाड आयोगाने इम्पेरिकल डाटा म्हणजे पाच लाख लोकांचा सॅम्पल सर्वे केला. असं ते म्हणाले.

‘इम्पेरिकल डाटा (Imperial data) म्हणजे सॅम्पल सर्वे, जनगणना नाही.
केंद्राचा संबंध नाही. तो गायकवाड कमिशनने केला, त्याच्या आधारे मराठा समाज आहे
हे ऑनपेपर आणलं. मराठा समाज मागास असेल आणि आरक्षण द्यायचं असेल,
तर पन्नास टक्के पेक्षा अधिक द्यायला पर्याय द्या असं म्हटलं. हा कोर्टाने मान्य केलं,
सुप्रीम कोर्टाने मान्य नाही केलं.
असाच इम्पेरिकल डाटा जोपर्यंत महाराष्ट्र सरकार ओबीसीचा तयार करत नाही.
तोपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही.
उगाचच गैरसमज निर्माण करू नका, असे ते म्हणाले.

Web Title : Chandrakant Patil । chandrakant patil gave a open challenge to chhagan minister and ncp leader bhujbal said

Related Posts