IMPIMP

Chandrakant Patil | ‘क्रांती रेडकरच नाही तर मलाही बाळासाहेबांची आठवण येते’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | ministers in mahavikas aghadi should fill their bags chandrakant patil in kolhapur

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन  Chandrakant Patil | मुंबई क्रूझ पार्टी प्रकरणावरुन अनेक खुलासे समोर येत आहेत. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. तसेच रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे. बाळासाहेबांची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली. असं भावनिक पत्र रेडकर यांनी पाठवलं आहे. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यावेळी ते सोलापुरात बोलत होते.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्याला बाळासाहेबांची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.
त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, क्रांती रेडकरच नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाही वारंवार बाळासाहेबांची आठवण येते.
बाळासाहेब असते तर त्यांनी काठी घेऊन सगळ्यांना बरोबर केलं असतं.
1995 ते 1999 काळात सरकार असताना कुणाची हिंमत होत नव्हती कोणाची… बाळासाहेब चुकणाऱ्या मंत्र्यांना मातोश्रीवर बोलवत असतं. असं पाटील
यांनी म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी न्याय मिळावा याबाबत एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)
यांना लिहिलं आहे. त्यामुध्ये बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत न्याय करण्याची विनंती केली.
‘आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं… एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खाजगी हल्ले हे राजकारणाचं किती नीच स्वरुप आहे हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे… आज ते नाही पण तुम्ही आहात… त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो… तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे… तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे… म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय… तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती.
असं एक पत्र रेडकर यांनी उद्धव ठाकरे यांनी पाठवलं आहे.

 

Web Title : Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil said not only kranti redkar but i also remember balasaheb thackeray

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’

Pune News | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर घणाघात, भाजप नगरसेवक धनराज घोगरेंच्या प्रकरणावरून म्हणाले – ‘ही तर संघटीत गुन्हेगारी’ (व्हिडीओ)

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीची ‘सुवर्ण’संधी; चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी घसरण

 

Related Posts