IMPIMP

Maharashtra Rains | महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; 5 जिल्ह्यांना ‘Alert’

by nagesh
Rain In Maharashtra | rain for the next four days warning of heavy rain in palghar pune nashik district imd

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Maharashtra Rains | मागील महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. त्यानंतर हळूहळू पावसाने उघडीप घेण्यास सुरूवात केली. मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, काही प्रमाणात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. काही कालावधीच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस भरारी घेण्याची शक्यता आहे. आता 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी राज्यात (Maharashtra Rains) काही ठिकाणी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून IMD (Indian Meteorological Department) देण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी (Maharashtra Rains) पोषक हवामान निर्माण होतं आहे. त्यामुळे नोव्हेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे.
1 आणि 2 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा (Maharashtra Rains)
इशारा (Indian Meteorological Department) दिला आहे.
सोमवारी 1 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर रायगड, सोलापूर आणि पुण्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसरणार आहेत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दक्षिण-पूर्ण बंगालच्या उपसागरात 4 ते 10 नोव्हेंबर दरम्यान हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रीय होणार आहे.
पण हे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र न होता, सामान्य अवस्थेतचं पश्चिम दिशेनं पुढे सरकणार आहे.
त्यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मंगळवारी 2 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी
करण्यात आला आहे.
तसेच, पुणे, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधित परिसरात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | rainfall possibilities in maharashtra with lighting imd give yellow alert to 5 districts know name of district

 

हे देखील वाचा :

Pune News | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर घणाघात, भाजप नगरसेवक धनराज घोगरेंच्या प्रकरणावरून म्हणाले – ‘ही तर संघटीत गुन्हेगारी’ (व्हिडीओ)

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीची ‘सुवर्ण’संधी; चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी घसरण

Pune News | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा सभागृह नेते गणेश बिडकरांवर हल्लाबोल, प्रशांत जगताप म्हणाले – ‘आरोप करताना आपले हात धुतलेले आहेत का पहावं; 100 कोटींच्या प्रॉपर्टीवरून देखील…’ (व्हिडीओ)

 

Related Posts