IMPIMP

Pune News | राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर घणाघात, भाजप नगरसेवक धनराज घोगरेंच्या प्रकरणावरून म्हणाले – ‘ही तर संघटीत गुन्हेगारी’ (व्हिडीओ)

by nagesh
Pune NCP | NCP Pune City President Prashant Jagtap On Ruling BJP In Pune Municipal Corporation (PMC) 

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | दोन दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे (bjp corporator dhanraj ghogre) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एका ठेकेदाराने घोगरे यांच्यावर आरोप केला आहे की, घोगरे यांनी काम देण्याच्या बदल्यात पैसे घेतले. काम न दिल्याने पैशांची मागणी केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप संघटीत गुन्हेगारी करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला (Pune News) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

प्रशांत जगताप म्हणाले, धनराज घोगरे प्रकरणात ठेकेदाराने पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केला होता. 15 दिवस पाठपुरावा केल्यानंतर हे प्रकरण पोलीस आयुक्त यांच्याकडे गेले. त्यानंतर घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित फिर्यादीला धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर महापौरांनी (mayor) अर्चना पाटील (Archana Patil) यांचे पती तुषार पाटील (Tushar Patil) यांना फोन करुन फिर्यादीला गप्प करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तुषार पाटील यांनी तडीपार गुंड सदा ढावरे (Sada Dhaware) जो भाजपचा पदाधिकारी आहे त्याला फिर्यादी यांचे अपहरण (Kidnapping) करण्यास सांगितले, असा खळबळजनक गौप्यस्फोट जगताप (Pune News) यांनी केला.

 

 

https://fb.watch/8XJLXEZcum/

 

गुंड ढावरे याने महापौर आणि तुषार पाटील यांच्या आदेशानुसार फिर्यादीचे अपहरण केले. त्याला जबरदस्तीने कोर्टात घेऊन गेले. त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) लिहून घेतले की आपल्याला मारहाण झालेली नाही. आपली कोणतीही तक्रार नाही. दरम्यान, फिर्यादी यांनी लघुशंकेच्या बहाण्याने तेथून पळून जाऊन दत्तवाडी पोलीस स्टेशन (Dattawadi Police Station) गाठलं. त्याठिकाणी त्यांनी सर्व हकीकत सांगितल्यानंतर पोलिसांनी सदा ढावरेला अटक केली, असे जगताप यांनी सांगितले.

पोलिसांनी सदा ढावरे कडे चौकशी केली असता त्याने या प्रकरणात आपला काहीही संबंध नाही. तुषार पाटील यांनी सांगितल्यामुळे संबंधित व्यक्तीचे अपहरण केल्याचे सांगितले. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी तुषार पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पाटील यांनी आपण बाहेर असून महापौरांनी आपल्याला आदेश दिले होते. त्यामुळे ही जबाबदारी ढावरेवर सोपवण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट प्रशांत जगताप यांनी केला आहे. तसेच ढावरे आणि पाटील यांच्यावर अपहरण आणि खोटे कागदपत्र तयार करण्याचा गुन्हा (FIR) दत्तवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याचे जगताप यांनी (Pune News) सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महापौर हे सर्वोच्च पद, म्हणून…

महापौरांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार नाही. कारण महापौर पद हे सर्वोच्च असतं.
महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. अशा माध्यमातून महापौरांवर चिखल फेक करणं योग्य नाही.
परंतु ऑन रेकॉर्ड महापौरांच्या आदेशानुसार अपहरण झाले.
याप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि ज्या बिडकरांनी सत्संग
आणि बाकीच्या गोष्टी ऐकवल्यात त्या बिडकरांनी याचा खुलासा करावा.
तसेच या प्रकरणात तुषार पाटील आणि सदा ढावरे यांच्यावर गुन्हा कसा दाखल झाला,
तुषार पाटील यांनी महापौरांचे नाव कसे घेतले याचा खुलासा करावा असे आव्हान जगताप यांनी केले.

 

हे संघटित गुन्हेगारीचे प्रकरण
हे प्रकरण संघटीत गुन्हेगारीचे प्रकरण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta)
यांची उद्या भेट घेणार आहे. त्यावेळी त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी (Pune News) सांगितले.

 

Web Title :- Pune News | NCP’s city president Prashant Jagtap lashes out at BJP, says upon BJP corporator Dhanraj Ghogare’s case – ‘This is organized crime’ (video)

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीची ‘सुवर्ण’संधी; चांदीच्या किमतीत सुद्धा मोठी घसरण

Pune News | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा सभागृह नेते गणेश बिडकरांवर हल्लाबोल, प्रशांत जगताप म्हणाले – ‘आरोप करताना आपले हात धुतलेले आहेत का पहावं; 100 कोटींच्या प्रॉपर्टीवरून देखील…’ (व्हिडीओ)

Gangster Chhota Rajan | 38 वर्षांपूर्वी 2 पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात कुख्यात गँगस्टर छोटा राजन ‘निर्दोष’

 

Related Posts