IMPIMP

काँग्रेसच्या ‘त्या’ खराब कामगिरीवर रोकठोक बोलले संजय राऊत ! महाविकास आघाडीत ठिणगी ?

by sikandershaikh
congress should think about its performance gujarat municipal election says shiv sena mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)गुजरातमधील महापालिका निवडणुकांमध्ये (Gujarat Municipal Election Results 2021) भाजप (Bharatiya Janata Party- BJP) नं शानदार विजय मिळवला. भाजपनं 6 पैकी 6 महापालिका आपल्याकडे कायम राखल्या आहेत. भाजपनं महापालिका निवडणुकीत 575 पैकी 484 जागा जिंकल्या. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) देखील चांगलं यश मिळवलं आहे. परंतु काँग्रेस (Indian National Congress) ची कामगिरी मात्र खूपच निराशाजनक झाली. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

संजय राऊत म्हणाले, काँग्रेस पक्षाची अवस्था अशी का, याचा विचार पक्षानं करायला हवा. गुजरातच्या जनतेनं का नाकारलं याबद्दल काँग्रेसनं मनन करायला पाहिजे. सुरत एक महत्त्वाची महापालिक आहे. तिथं आम आदमी पक्ष विरोधी पक्षात बसेल. आपनं गुजरातमध्ये प्रवेश केला आहे. एका महत्त्वाच्या पालिकेत त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं आहे. याचा विचार काँग्रेसनं केला पाहिजे.

‘काँग्रेसचं या प्रकारे होणारं पतन लोकशाहीसाठी योग्य नाही’

पुढं बोलताना राऊत म्हणाले, गुजरातमधील (Gujarat Municipal Election) कामगिरीचा विचार काँग्रेस पक्षाला करावा लागेल.
आम्हा सगळ्यांना करावा लागेल. आपला चांगलं यश मिळालं आहे.
मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाला जनेतनं नाकारलं आहे.
गुजरात असो किंवा इतर राज्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
काँग्रेसचं या प्रकारे होणारं पतन लोकशाहीसाठी योग्य नाही असंही राऊत यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

 

Coronavirus : खुशखबर ! 1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; ‘या’ लोकांना मोफत मिळणार ‘कोरोना’ लस

Related Posts