IMPIMP

काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे दिले संकेत 

by sikandershaikh
Faisal-ahmed

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकॉंग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल (ahmed patel ) यांच्या निधनानंतर प्रथमच त्यांचा मुलगा फैसल पटेलने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अहमदाबादमध्ये कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले फैसल म्हणाले की, जर काँग्रेस हाय कमांडने सांगितले तर ते निवडणूक लढविण्यास तयार आहेत.

अहमदाबादसह सहा महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री उशिरा अहमदाबादच्या खाडिया येथे पोहोचलेले फैसल पटेल म्हटले की,  कॉंग्रेस हाय कमांड त्यांना जे काही सांगेल त्यासाठी ते तयार आहेत. जर हाय कमांडने त्यांना निवडणूक लढविण्याचे आदेश दिले तर ते निवडणुका लढण्यासही तयार आहेत. आगामी 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत ते आपले नशीब आजमावतील असा अंदाज मांडला जात आहे.

खासदार अहमद पटेल यांचे  कोरोनामुळे निधन
खासदार अहमद पटेल (ahmed patel ) यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी राजकारणात येण्यास स्पष्टपणे नकार दिला. अहमद पटेल यांचा मुलगा फैसल आणि मुलगी मुमताज म्हणाले होते की,  ते त्यांच्या वडिलांच्या वतीने सामाजिक कार्य करत राहतील आणि निःस्वार्थपणे जनतेची सेवा करतील.

Related Posts