IMPIMP

Govinda Joins Shivsena Eknath Shinde | अभिनेता गोविंदाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, वायव्य मुंबईतून लढवणार निवडणूक (Video)

by sachinsitapure

मुंबई : Govinda Joins Shivsena Eknath Shinde | अखेर अभिनेता गोविंदाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी दिली जाणार आहे. जर येथून गोविंदाला उमेदवारी मिळाली शिवसेना शिंदे गटातील नेते गजानन किर्तीकर यांचे पूत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाचे तोंडभरून कौतूक केले.

गोविंदा म्हणाला, जय महाराष्ट्र. मी शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि शुभेच्छा स्वीकारतो. आज या पक्षात प्रवेश करत आहे ही माझ्यासाठी देवाने दिलेली प्रेरणा आहे. मी २०१९ ला राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटले नव्हते पुन्हा या क्षेत्रात येईन. पण वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात आलो आहे.

गोविंदा म्हणाला, दिलेली जबाबदारी इमानदारीने पार पाडेन. मी कला आणि सांस्कृतिक विभागात चांगले काम करेन. ही जन्मभूमी संताची आहे. या भूमीत सगळे आहे.

मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना गोविंदा म्हणाला, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईचे सुशोभीकरण वाढले. कामांना गती मिळाली. प्रदूषण कमी होत आहे. आता मुंबई फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसत आहे. माझ्यावर शिवकृपा राहिली. बाळासाहेब यांची देखील आमच्या कृपा होती. मुंबईतील फिल्म सिटी जगातील सर्वात भारी फिल्म सिटी करणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील.

दरम्यान, अभिनेता गोविंदा याने २००४ साली काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याने भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता.

Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

Related Posts