IMPIMP

महादेव जानकर 3 दिवसांपासून बारामतीत; लोकसभा लढवण्याचे दिले ‘संकेत’?

by bali123
mahadev jankar baramati three days preparations lok sabha elections begin

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन – बारामतीच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला खूप भरभरुन प्रेम दिले आहे. त्यामुळे मी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून पुढील रणनीती आखण्यासाठी माझे हे दौरे असल्याचे सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर mahadev jankar यांनी बारामतीतून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

महादेव जानकर mahadev jankar हे गेल्या तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघामध्ये आहेत. यावेळी जानकर आपल्या जुन्या मित्रांना भेटत आहेत, पक्षाच्या कर्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी ऐकून घेत आहेत. याशिवाय ते सायकलिंग करणे, पोहणे, शेतातील वस्तीवर मुक्कामी राहून तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. जानकर यांच्या बारामती दौऱ्यामुळे ते पुन्हा बारमती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

महादेव जानकर mahadev jankar यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जानकर यांचा पराभव झाला असला तरी जानकर यांना मिळालेल्या मतांची त्यावेळी चर्चा झाली होती. सुप्रिया सुळे यांनी जानकर यांचा केवळ 67 हजार 719 मतांनी पराभव केला होता. ऐनवेळी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून देखील त्यांना चांगले मतदान झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा जानकर याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. यासाठी राजकीय व्यूहरचना सुरु केल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सरकारला निशाणा साधताना इशारा दिला आहे. अधिवेशन संपेपर्यंत सरकारने वीज तोडणार असल्याचे जाहीर केले. मात्र, अधिवेशन संपताच शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु केली. तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करा अन्यथा रासप मोठे आंदोलन करेल असा इशारा महादेव जानकर यांनी दिली आहे.

Mumbai : पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Related Posts