IMPIMP

Maharashtra Budget 2021 : विरोधक आक्रमक म्हणताहेत; ‘आज त्यांना आम्ही सोडणार नाही’

by bali123
maharashtra budget 2021 today last day convention and bjp will take aggressive stance legislative

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय budget 2021 अधिवेशन आज संपन्न होत आहे. राज्याचे हे अधिवेशन 10 दिवसांपैकी 8 दिवसांत झालं. आज या अधिवेशनाचा budget 2021 शेवटचा दिवस आहे. असे असताना विरोधकांकडून सरकारला घेरले जाणार आहे. त्यानुसार तयारी केली जात आहे. आज आम्ही त्यांना सोडणार नाही, असे विरोधकांकडून सांगण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांनी पतीचा खून केल्याचा आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला. एटीएसकडे दिलेल्या जबाबात तिने यावर भाष्य केले. त्यानुसार, देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना तत्काळ निलंबित व अटक करण्याची मागणी केली. सचिन वाझेंवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. वाझे हे यापूर्वी कोणत्या पक्षात होते? हिरेन यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन सापडले. ते धनंजय गावडे कोणत्या पक्षात आहेत? वाझेंबाबत पुरावे असताना त्यांना का पाठीशी घातले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून यावर भाष्य केले. ते म्हणाले, सचिन वाझे आणि गावडे यांची पार्टी कोणती? त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही देत आहात! गुन्हेगाराचा पक्ष नसतो. त्यांना निलंबित केलेच पाहिजे! महाराष्ट्राच्या हितासाठी मी माहिती गोळा करेनच, माझी काय चौकशी करायची असेल ती करा!

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Related Posts