IMPIMP

‘ओलीस ठेवता का ? भीक देत नाही’, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली

by sikandershaikh
Devendra Fadnavis | so will Ajit Pawar be hanged Devendra Fadnavis got angry in the House over that issue

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)मुंबईत आजपासून (सोमवार दि 1 मार्च 2021) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (budget session) सुरुवात करण्यात आली. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळाचं कामकाज चालवलं जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पहिल्याच दिवशी वाद पेटल्याचं दिसून आलं. विधीमंडळात वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय गाजताना दिसत आहे. वैधानिक विकास महामंडळावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला धारेवर धरलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाकयुद्ध झालं.

अजित पवारांनी 15 डिसेंबर 2020 रोजी आश्वासन दिलं होतं की, वैधानिक विकास मंडळं स्थापन करून देऊ. त्याला 72 दिवस झाले. ते करणार आहात की, नाही ते सांगा असा सवाल मुगंटीवारांनी केला.

यावेळी अजित पवारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडून सुरू असलेल्या अडवणुकीकडे सरकारचं लक्ष वेधलं. आम्ही विकास महामंडळ स्थापन करू. बजेटमध्ये (budget session) मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करू असं पवारांनी सांगितलं.

दरम्यान 12 आमदारांचा विषय काढताच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.
अजितदादांच्या मनात होतं तेच ओठी आलंय.
आमदारांच्या नावाखाली विकास मंडळ आणि मराठावाडा, विदर्भातील लाखो लोकांना ओलीस ठेवलं आहे का ? असा सवाल फडणवीसांनी केला.

पुढं बोलताना ते म्हणाले, आमचं हक्काचं आहे ते आम्ही मागतोय.
काही भीक मागत नाही. जो काही संविधानानं अधिकार दिला आहे तो आम्ही मिळवणारच.
मी अजितदादांच्या या वक्तव्याचा निषेध करतो.
आमच्या अधिकारांचं हनन होत असेल तर आम्ही एक मिनिटही बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

‘तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या’ असं म्हणत अजित पवारांनी मुनगंटीवारांना दिलं ‘हे’ उत्तर ! म्हणाले…

Related Posts