IMPIMP

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

by bali123
Maharashtra Political Crisis | Raj thackeray take entry in maharashtra political crisis eknath shinde revolt against shivsena MNS chief said

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीपासून पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात रुग्णवाढीचा आकडा 16 हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध लादले आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईत मागील तीन दिवसात दीड हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अंशत: लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. अचानक वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने mns मात्र सवाल उपस्थित केले आहेत.

राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्नसोहळे, अंत्ययात्रा ते कार्यालयीन उपस्थितीवर मर्यादा घालण्यात आली आहे. लग्नाला 50, अंत्यविधीला 20 तर कार्यालयात 50 टक्के स्टाफला उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने नव्याने घातलेले निर्बंध मनसे mns ला पटलेले नाहीत. मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सदीप देशपांडे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कार्यालयात फक्त 50 टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला, तर मग सरकार 50 टक्के टॅक्स घेणार आहे का ? नोकरी, व्यवसाय केले नाही तर लोकांनी पैसे कुठून भरायचे ? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांनी या संदर्भात एक खोचक ट्विट केले आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांत कोरोना वाढत नाही. महाराष्ट्रात मात्र वाढतोय. कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे ? की स्वत:चं अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतोय ? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts