IMPIMP

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

by bali123
bengaluru influencer hitesha chandranee booked for assaulting zomato worker kamaraj

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटो ( Zomato ) च्या डिलिव्हरी बॉयला गेल्या आठवड्यात बंगळुरूमध्ये ऑर्डर रद्द केल्यानं तरुणवीर हल्ला केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्याला सशर्त जामीन मंजुर झाला. परंतु आता या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.

हितेशा चंद्रानी विरोधात FIR
डिलिव्हरी बॉय कामराज (Kamaraj) नं त्याच्यावरील सर्व आरोप नाकारत आता मॉडेल आणि सोशल मीडिया कंटेट क्रिएटर हितेशा चंद्रानी (Hitesha Chandranee) हिच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यानं दिलेल्या तक्रारीनंतर आता बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनि्क्स सिटी पोलीस ठाण्यात हितेशाविरोधात आयपीसीमधील कलम 355 (हल्ला), 504 (अपमान) आणि 506 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहेत कामराजचे आरोप ?
कामराजनं आरोप केलाय की, आधी हितेशानंच त्याला शिव्या दिल्या आणि चपलेनं मारलं. कामराज म्हणाला, ट्राफिकमुळं डिलिव्हरी करण्यास थोडा उशीर झाला होता. त्यामुळं मी त्यांची माफी मागितली. परंतु त्या रागात होत्या. त्यावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं मला उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी डिलिव्हरीचे पैसे देण्यास नकार दिला आणि झोमॅटो Zomato  च्या कस्टमर केअर सोबत बोलत असल्याचं सांगितलं. या दरम्यान झोमॅटो सपोर्ट स्टाफनं त्यांची ऑर्डर रद्द केल्याचं मला समजलं. त्यावर मी त्यांच्याकडून ऑर्डर परत मागितली. परंतु त्यांनी सहकार्य केलं नाही. अखेर मी ऑर्डर न घेता इमारतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचवेळी त्यांनी मला चपलेनं मारायला सुरुवात केली. मी स्वत:चा बचाव करत होतो. परंतु त्यावेळी मला मारण्याच्या नादात हितेशा यांच्या हातातली अंगठी त्यांच्याच नाकावर लागली आणि नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला असंही कामराज म्हणाला.

हितेशानं शेअर केला व्हिडीओ, सांगितली होती घटना
जेव्हा ही घटना घडली तेव्हा हितेशानं व्हिडीओ शेअर करत ऑर्डर कॅन्सल केल्यानं झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनं मारहाण केल्याचा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. नंतर झोमॅटोनंही तरुणीची माफी मागत डिलिव्हरी बॉयचं तात्पुरतं निलंबन केल्याचं जाहीर केलं होतं. परंतु आता डिलिव्हरी बॉयनं जे आरोप केले आहेत त्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

Related Posts