IMPIMP

मनसेचा सवाल, म्हणाले – ‘आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मध्यरात्रीनंतर ‘दिशा’च्या चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी कशी?

by bali123
mns leader santosh dhuri from waroli slams mla aditya thackeray for late night shooting permission for disha patani film

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाच्या या आवाहनाला आणि सरकारच्या नियमांना वरळीत हारताळ फासला जात असल्याचे आणखी एका घटनेमुळे समोर आले आहे. वरळी हा युवासेनाप्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे aditya thackeray यांचा मतदारसंघ आहे. मात्र, आदित्य ठाकरे aditya thackeray यांच्या मतदारसंघामध्ये रात्री उशिरापर्यंत अनेक पब सुरू असल्याचा आरोप मनसेने काही दिवसांपूर्वी केला होता.

मनसेकडून फेसबुकवर व्हिडिओ शेअर
मनसेच्या आरोपानंतर पब कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना वरळीमध्ये मध्यरात्रीपर्यंत अभिनेत्री दिशा पटनी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये भरवस्तीमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी केला आहे. धुरी यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

‘युवराजांची दिशा चुकली’
एका बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगवेळी वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या नियमांना मूठमाती दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. या शूटिंगसाठी दिशा पटनी आणि जॉन अब्राहम कोळीवाड्यात आले होते. या सर्व कलाकारांनी मास्क घातला नसल्याचा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. यावरून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केम छो वरळीचे मराठी सत्य’ अशा मथळ्याखाली धुरी यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यामध्ये ‘युवराजांची दिशा चुकली’ असा उल्लेख करून धुरी यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

शूटिंगसाठी परवानगी कोणाची होती ?
मनसे नेते धुरी यांनी असा दावा केला आहे की, शुक्रवारी कोळीवाड्यात संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेबारापर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी दिशा पटनी आणि जॉन अब्राहम उपस्थित होते. रात्री साडेबारा वाजता चित्रपटाचे शूटिंग बंद करण्यात आले. या शूटिंगसाठी परवानगी कोणाची होती ? याला युवराजांचा आशीर्वाद आहे की, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा, असा सवाल धुरी यांनी उपस्थित केला आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सामान्यांना एक न्याय आणि सेलिब्रिटींना एक न्याय. या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. एकाच्याही तोंडाला मास्क नव्हता. पब संदर्भातील प्रकार उघडकीस आल्यानंतरदेखील महापालिका अधिकारी अशा प्रकारची परवानगी देत असतील, तर ते निंदनीय असल्याचे संतोष धुरी यांनी म्हटले आहे.

 

Photos : सोनाक्षी सिन्हाच्या दबंग अवाताराचा सोशलवर ‘बोलबाला’ !

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

Related Posts