IMPIMP

Photos : सोनाक्षी सिन्हाच्या दबंग अवाताराचा सोशलवर ‘बोलबाला’ !

by bali123
sonakshi sinhas domineering avatar all over place photo going viral

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ( Sonakshi Sinha ) अ‍ॅक्टींग सोबतच लुकसाठीही फेमस आहे. सोशलवर अ‍ॅक्टीव असणारी सोनाक्षी आपल्या फोटोंमुळंही अनेकदा चर्चेत आली आहे. तिनं बोल्ड अवतारही खूपदा दाखवला आहे. पुन्हा एकदा तिनं आपल्या लुकनं अटेंशन घेतलं.

सोनाक्षीनं Sonakshi Sinha तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर ती खाकी वर्दीत दिसत आहे. रूळावर उभी राहून पोज देणारी सोनाक्षी दबंग अवतारात दिसत आहे. तिचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच ती एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तिचा हा लुक त्याच सीरिजमधला आहे. सीरिजचं नाव आणि रीलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. रिमा कागती आणि रुचिका अग्रवाल यांनी सीरिजचं डायरेक्शन केलं आहे. सीरिजमध्ये ती पोलिसाच्या रोलमध्ये दिसणार आहे. सोनाक्षीचे Sonakshi Sinha याच लुकमधील हे फोटो आहेत. यात ती दमदार अंदाजात दिसत आहे. तिनं हे फोटो महिला दिनी शेअर केले होते. तिनं याला खास कॅप्शनही दिलं आहे.

सोनाक्षीचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या या लुकचंही कौतुक केलं आहे.

सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती अजय देवगणचा सिनेमा भुज : द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. सिनेमात तिनं एका गुजराती महिलेची भूमिका साकारली आहे. तिनं मिशन मंगल, कलंक, खानदानी शफाखाना आणि दबंग 3 अशा काही सिनेमात काम केलं आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘दीपा’च्या ग्लॅमरस लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

तब्बल 20 वर्षांनंतर येणार RHTDM चा सीक्वल ! क्रिती सेननचं नाव फायनल

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

Related Posts