IMPIMP

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे PM मोदींच्या जवळचे; गृहमंत्र्यांच्या दाव्याने एकच गदारोळ

by bali123
mohan delkar suicide case praful khoda patel was home minister gujarat says anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – खासदार मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याने मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. दादरा-नगर हवेलीचे खासदार डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली होती. त्यावर आज बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्याचे नाव नसल्याचा दावा केला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख anil deshmukh यांनी फडणवीस यांचा हा दावा फेटाळून लावला.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये प्रफुल्ल खाेडा पटेल यांचे नाव आहे. डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे खाेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी जवळचे सहकारी होते, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केला. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ उडाला. भाजपने सर्व दावे फेटाळून लावत राज्य सरकार राजकीय सुडापोटी काम करत असल्याचा आरोप केला.

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमधून स्पष्ट होत आहे. दादरा नगर हवेली प्रशासक प्रफुल्ल खाेडा पटेल यांचे नाव घेतले आहे. खाेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये उल्लेख केलेले प्रफुल्ल खाेडा पटेल हे दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते यापूर्वी गुजरातचे
मुख्यमंत्री होते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना खाेडा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री होते, असा माझा कयास असल्याचं अनिल देशमुख
म्हणताच सभागृहात एकच गदारोळ उडाला.

खळबळजनक ! मनसुख हिरेन यांची हत्या पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी केल्याचा संशय; फडणवीसांचा आरोप

Related Posts