IMPIMP

आमदार रवी राणा अन् खासदार नवनीत कौर राणा बुलेटवरून विनामास्क सुस्साट, अमरावतीत ‘कोरोना’चा वाढतोय प्रादुर्भाव

by sikandershaikh
ravi-and-navneet-rana

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर या त्रिसूत्रीचा वापर करण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहे. पण अमरावतीमध्ये खुद्द लोकप्रतिनिधींकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासदार नवनीत कौर राणा (navneet rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून दुचाकीवरून सैर केली. पण हे करत असताना मात्र त्यांनी मास्कचा वापर केला नाही. त्यामुळेच आता ते चर्चेत आले आहे.

रवी राणा आणि नवनीत कौर राणा (navneet rana) यांचा हा दुचाकीवरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये राणा दाम्पत्य कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे भंग करत असल्याचे दिसत आहे. ते दोघांनीही दुचाकीवरून फिरताना तोंडाला मास्क लावला नाही. तसेच रवी राणा यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटही घातले नाही. त्यांनी हे कृत्य करून कायद्याचे उल्लंघनच केले आहे. म्हणून आता कायदे फक्त सामान्यांसाठी असतात का? असा प्रश्न विचारला जात आहे.

राणा दाम्पत्यावर अद्याप कारवाई नाही

राणा दाम्पत्य दुचाकीवरून जात असल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे, की त्यांनी कोणताही मास्क लावला नाही किंवा हेल्मेटही घातले नाही. हा नियमभंग करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता कायदे फक्त सर्वसामान्यांसाठी असतात का, असा सवाल केला जात आहे.

Related Posts