IMPIMP

Mumbai Local Train | पदभार स्वीकारताच रावसाहेब दानवे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई ‘लोकल’बद्दल केली मोठी घोषणा

by bali123
Mumbai Local Train | mumbai local service can be started if requested by the state government say raosaheb danve

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असताना मुंबईतील लोकल (Mumbai Local Train) रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची मागणी होत आहे. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने राज्य सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं सध्यातरी सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल (Mumbai Local Train) सेवा बंद ठेवली आहे. यातच भाजप खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी रेल्वे राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील लोकलवरुन राज्यातील ठाकरे सरकारवर (Thackeray government) निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारचा आहे

रावसाहेब दानवे म्हणाले, लोकल सुरु करण्यासंदर्भातील जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवण्यात आली आहे. ज्यावेळी राज्य सरकारला वाटेल आता कोरोनाची (Corona) स्थिती आटोक्यात आली आहे आणि रेल्वे सुरु करणं गरजेचे आहे.
राज्याने त्या ठिकाणचा अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला तर रेल्वे सुरु केली जाईल.
त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तोपर्यंत लोकल सुरु नाही

मुंबईतील लोकल सेवा कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वसामान्यांसाठी बंद आहे.
जोपर्यंत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन राज्य सरकारने ठरवून दिलेल्या लेव्हलमध्ये येत नाही, तोपर्यंत लोकल सेवा सुरु करणार नाही.
असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं होतं.
त्यामुळे आता लोकल सुरु करण्याचा निर्णय राज्याकडे असल्याचे सांगून रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे.

Web Title : Mumbai Local Train | mumbai local service can be started if requested by the state government say raosaheb danve

Related Posts