IMPIMP

Navneet Rana | नवनीत राणांच्या तक्रारीवरून मुंबईतील बडे अधिकारी (IAS-IPS) अडचणीत?

by nagesh
Navneet Rana | parliamentary committee notice to maharashtra dgp and mumbai police commissioner over navneet rana complaint

मुंबई :  सरकारसत्ता  ऑनलाइन – अमरावतीच्या खासदार नवीनत राणा (Navneet Rana) यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने (Parliamentary Committee) घेतली आहे. खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणा (Navneet Rana) यांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या याच आरोपावर आता दिल्लीत फैसला होणार आहे. संसदीय समितीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (Maharashtra DGP), मुख्य सचिव (Chief Secretary), मुंबईचे पोलीस आयुक्तांसह (Mumbai CP) आणखी एका बड्या अधिकाऱ्याला 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वांची दिल्लीत चौकशी होणार आहे.

नवीनत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना अटक (Arrest) करण्यात आल्यानंतर खार पोलीस ठाण्यात पोलिसांकडून जी वागणूक दिली गेली होती त्याबद्दल संसदीय समितीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल अखेर संसदीय समितीकडून घेण्यात आली आहे. समीतीने चार अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव (Manu Kumar Srivastava), राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ (DGP Rajneesh Sheth), मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) आणि भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास (Byculla Jail Superintendent Yashwant Bhanudas) यांचा समावेश आहे.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर मोठा गदारोळ झाला होता. याप्रकरणी राणा दाम्पत्याला जेलमध्ये देखील जावे लागले होते. राणा दाम्पत्याला जवळपास दोन आठवडे जेलमध्ये रहावे लागले होते.
या दरम्यान खार पोलीस ठाण्यात पोलिसांकडून योग्य वागणूक न मिळाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता.
याप्रकरणी राणा यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती.
त्यांच्या या तक्रारीची समितीकडून दखल घण्यात आली असून राज्यातील चार जणांना नोटीस पाठवली आहे.

Web Title :- Navneet Rana | parliamentary committee notice to maharashtra dgp and mumbai police commissioner over navneet rana complaint

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Disha Patani Baby Bump | दिशा पतानीच्या पोटाची अवस्था पाहून नेटकरी पडले चिंतेत, मोठा टी-शर्ट आणि विनामेकअप दिसली अभिनेत्री..

Pune NCP | माफी मागा अन्यथा राष्ट्रवादीच्या घेरावास तयार राहा, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचा चंद्रकांत पाटलांना इशारा

Pune Traffic Police | महामेट्रोच्या कामामुळे पर्णकुटी व Gold Adlabs Chowk येथील वाहतुकीत आजपासून बदल; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा

Related Posts