IMPIMP

Rohit Pawar : ‘भातखळकरजी उगीच नाकाने कांदे कशाला सोलता, तुमचेच वांधे होतील’

by nagesh
ncp leader rohit pawar hits back bjp leader atul bhatkhalkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर जोरदार डान्स केला. त्यांचा हा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून भाजप नेत्यांकडून रोहित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी कोरोना रुग्णांना नातेवाईकांची भेट घेण्याची परवानगी नाही अन् कोविड सेंटरमध्ये रोहित पवारांना नाचायची परवानगी आहे? वडिलोपार्जित कंपन्यांसारखे सरकार चालवू नका. नियम सगळ्यांना सारखे हवेत, असे म्हणत पवारांवर टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार Rohit Pawar यांनी भातखळकरांना प्रत्युत्तर दिले आहे. नियमांची गोष्ट कोण करतंय ? भातखळकरजी आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा आधी. उगीच कशाला नेहमीच नाकाने कांदे सोलण्याचा प्रयत्न करता ? यामुळे स्वतःचेच जास्त वांधे होतील, असा पलटवार आमदार पवार यांनी केला.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याचा कोरोना लस घेतानाचा फोटो ट्विट केला आहे. 45 वर्षांखालील नागरिकांना कोरोना लस घेण्याची परवानगी नसताना तन्मय फडणवीस याने लस टोचून घेतली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पर्यायाने भाजप अडचणीत आला होता. याच मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनी अतुल भातखळकर यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Also Read :

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, ED कडून निकटवर्तीयाच्या घरावर छापा

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

 

Related Posts