IMPIMP

NCP Sharad Pawar On Modi Govt | ”भाजपाच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट”, शरद पवार यांचा मोदी सरकारवर आरोप

by sachinsitapure

नाशिक : NCP Sharad Pawar On Modi Govt | युपीएचे सरकार (UPA Govt) असताना शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांच्या खांद्यावरचे ओझे उतरवले होते. भाजपा सरकारची शेतकऱ्यांबद्दल अनास्था असल्यामुळे शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केला. ते चांदवड, नाशिक येथे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त (Bharat Jodo Nyay Yatra) आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

या मेळाव्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, द्राक्ष, कांदा, कापूस या शेतमालाला भाव मिळत नाही, अशी स्थिती आहे. शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पाहिजेत, अशी भूमिका घेतली पाहिजे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपाचे सरकार जबाबदार आहे.

या मेळाव्या मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले, शेतकरी आंदोलनाची दखल मोदी सरकार घेत नाही. मोदी सरकारने २२ अरबपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे एक रुपयाचेही कर्ज माफ केले नाही. ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार?

काँग्रेस सरकारचे दरवाजे शेतकरी व सर्वसामान्यांसाठी सदैव खुले असतील. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून बाहेर काढू. पीक वीमा योजनेची पुनर्रचना करून, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती. पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत करा.

तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपाच्या राज्यात आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही. पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला, पण आज शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे मोदी तो गयो.

Pune Hadapsar Crime | पुणे : मानलेल्या बहिणीला छेडल्याच्या कारणावरुन वाद, दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; चार जणांना अटक

Related Posts