IMPIMP

Pandharpur : भाजपला मोठा धक्का, कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

by pranjalishirish
pandharpur by election bjp leader kalyanrao kale will join ncp on april 8 in the presence of ajit pawar

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्याचवेळी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे मोठे नेते कल्याणराव काळे Kalyanrao Kale  यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून काळे यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. अखेर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून अजित पवार यांच्या दौऱ्याच्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. काळे यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

दरम्यान, कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांच्या मनधरणीसाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आले होते. मात्र, कल्याणराव काळे Kalyanrao Kale यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा निरोप दिल्याने निंबाळकर यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

चंद्रकांत पाटलांचे मोठं वक्तव्य, म्हणाले – ‘कुणाच्या कुबड्या न घेता 2024 मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार, आणि..

बारामतीत अजित पवारांसोबत चर्चा

काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार बुधवारी बारामती येथे अजित पवार यांच्याशी झालेल्या अंतिम चर्चेनंतर काळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित झाला. गुरुवारी अजित पवार यांच्या दौऱ्यात ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याची कुणकुण लागताच खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात मनधरणीसाठी गेले होते. त्याचवेळी आमदार संजय शिंदे त्या ठिकाणी आल्याने दोन्ही नेत्यांची पंचाईत झाली होती.

कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर ते आश्वासन पाळले नसल्याने काळे नाराज होते. दरम्यानच्या काळात शरद पवार यांच्या एका कार्यक्रमात काळे हे व्यासपीठावर दिसल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, त्यांनी अधिकृतपणे प्रवेश केला नव्हता.

अनिल देशमुख SC चे दार ठोठावण्यासाठी दिल्लीत, तर 100 कोटीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी CBI टीम मुंबईत

राष्ट्रवादीचे पारडे जड

पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत दोन साखर कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने समाधान अवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यातच कल्याणराव काळे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर काळे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे.

‘100 कोटींच्या टार्गेटची आठवण पदावरुन हटवल्यावरच का झाली?’, राज ठाकरेंचा सवाल

काळेंच्या प्रवेशाचा असा शिजला प्लॅन

कल्याणराव काळे Kalyanrao Kale  यांनी या निवडणुकीत सक्रीय व्हावे यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी कडून प्रयत्न केले जात होते. 30 मार्च रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी संजय शिंदे यांनी काळेंच्या आढीव येथील फार्महाऊसवर पक्ष प्रवेशा विषयी प्लॅन शिजवला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा घडवून आणली. त्याच दिवशी संजय शिंदे हे काळे यांना घेऊन बारामतीला अजित पवारांच्या भेटीला गेले. या भेटीत मागे जे काही झाले ते विसरून काळे यांना पक्षात समावून घेत त्यांना भविष्यात राज्य सरकारकडून आवश्यक मदत करण्याचे आश्वासन काळे यांना देण्यात आले. त्यानंतर काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला.

Raj Thackeray : ‘माझ्यासाठी अनिल देशमुखांचा विषय महत्त्वाचा नाही, अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं’

कोण आहेत कल्याणराव काळे ?

कल्याणराव काळे हे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांचे तालुक्याच्या राजकारणात चांगले वजन आहे. त्यांच्याकडे दोन साखर कारखान्यांसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, दोन पतसंस्था, काही शैक्षणिक संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 60 हजारांहून अधिक मते मिळाली होती. सध्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील 22 ग्रामपंचायतींमध्ये काळे गटाचे अनेक सदस्य निवडून आले आहेत. याच परिसरात साखर कारखान्याचे संचालक व कर्मचारी वर्गाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे काळे गटाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची आहे.

Read More : 

‘अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु, CBI ने कारवाई करावी’

‘सचिन वाझे, परमबीर यांनी जे केलं तेच देशमुखांनी कारावे, शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करण्याचे सांगितलं असं थेट सांगावं’

जे समोर आलं ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे, आगे आगे देखो…होता है क्या?’ – भाजप नेते गिरीश महाजन

राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा ‘हल्लाबोल’, म्हणाले – ‘परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’

‘देशानं पहिल्यांदाच पोलीस बॉम्ब ठेवतात अन् गृहमंत्री हप्ता वसुली करताना पाहिलं’

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

पश्चिम बंगाल : मतदानांपूर्वीच नेत्याच्या घरी EVM मशीन !

शिवेंद्रसिंहराजे म्हणतात – ‘व्यवसाय बंद ठेवून मरण्यापेक्षा…’

ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला अन् ताई विचारतात, नवा वसुली मंत्री कोण ?

Related Posts