IMPIMP

देवेंद्र फडणवीसांचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही’

by sikandershaikh
there was no pressure on fadnavis to reinstate sachin vaze says minister nawab malik

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Pooja Chavan suicide case | कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) वरू राज्य सरकार आणि सीएम ठाकरेंवर जोरादार टीका केली.

‘धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही’

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही. मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला असतानाही ते दिसत होतं असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

‘कुणाला साधूसंत ठरवायचं असेल तर ठरवा, मात्र तुमच्या नैतिकतेचं काय ?’

पुढं बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या क्लीप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोटं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. कुणाला साधूसंत ठरवायचं असेल तर ठरवा. मात्र तुमच्या नैतिकतेचं काय ? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

Related Posts