IMPIMP

Pritam Munde | प्रीतम मुंडेंना डावलल्याचा भाजपला मोठा फटका, बीडमध्ये 2 दिवसांत 74 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

by bali123
Pritam Munde | bjp office bearers resignation session continues beed 74 people resigned 2 days

बीड न्यूज (Beed News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) नुकताच पार पडला. यामध्ये खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रिमडळातून डावलण्यात आले. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावल्यानंतर भाजपमध्ये राजीनामा (Resignation) सत्र सुरु झाले आहे. मागील दोन दिवसांमध्ये तब्बल 74 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. हा भाजपला मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मोदी सरकार -2 च्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार अशी चर्चा होती. मात्र तसे न झाल्याने नाराज मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने राजीनामे दिले. रविवारी पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लात आल्यावर त्या केंद्रीय नेतृत्वापुढे प्रीतम मुंडेंबद्दलची आपली बाजू मांडतील, असे म्हटले जात होते. तथापी, त्यांनी आधीच स्पष्ट केले होते की, बहिणीला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ती आणि तिचा परिवार नाराज नाही.

आजपर्यंत 74 राजीनामे

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर, बीड जिल्ह्यातील भाजप पदधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरु केले आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आतापर्यंत 74 राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीसह 3 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

मुंडे समर्थकांमध्ये नाराजी

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आम्ही कधीही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य भागवत कराड यांचा समावेश झाल्यामुळेही मुंडे समर्थक नाराज आहेत, असे म्हटले जाते. पहिल्यांदा खासदार झालेले कराड यांना बळ दिल्यास मराठवाड्यातील मुंडे यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, अशा नजरेतून पाहिले जात आहे.

भाजपचं अंतर्गत राजकारण

मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा होती. परंतु ते अंदाज फोल
ठरले मात्र अनपेक्षितपणे भागवत कराड यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. दुसऱ्यांदा खासदार
म्हणून निवडून आलेल्या मुंडे यांना डावलून कराड यांना का संधी दिली गेली ? यावर अनेक तर्क
लावले जात आहेत. भाजपचं अंतर्गत राजकारणाचीही यावरुन चर्चा रंगत आहे. त्यात कराड हे मुंडे
कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात.

Web Titel :  Pritam Munde | bjp office bearers resignation session continues beed 74 people resigned 2 days

Related Posts