IMPIMP

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून निर्बंध शिथिल होणार? अजित पवार अन् उध्दव ठाकरे यांच्या चर्चा; मुख्यमंत्र्यांनी दिला ‘ग्रीन’ सिग्नल

by bali123
Pune Unlock | Restrictions to be relaxed in Pune from Monday? Discussions between Ajit Pawar and Uddhav Thackeray; The CM gave the 'green' signal

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Unlock | मागील तीन महिन्यापासून पुणे निर्बंधाच्या पट्यात अडकले आहे. निर्बंध कधी मुक्त होईल याच्या प्रतीक्षेत पुणेकर आहेत. सध्या राज्य सरकरने पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) कमी असणाऱ्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असून देखील निर्बंध शिथिल का नाही. हा पुणेकरांना प्रश्न आहे. मात्र त्या प्रश्नाला आता हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई नंतर आता पुण्यात देखील सोमवारपासून निर्बंध शिथिल (Pune Unlock) होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याशी पुणे निर्बंधाबाबत शनिवारी चर्चा केली आहे. यामध्ये पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, उद्या (रविवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पूण्यात आहेत. शुक्रवारी होत असलेली आढावा बैठक आता उद्या (रविवारी) घेण्यात येणार आहे. या बैठकीदरम्यान, याबाबत अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. कोरोना रुग्णाची संख्या घटल्यानंतर राज्य सरकारने मुंबईसह काही जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यासह आता पुण्यात देखील निर्बंध शिथिल होणार आहे.

दरम्यान, पुणे शहरातील (City of Pune) कोरोना बाधितांची संख्या घटत असतानाही येथील निर्बंध शिथिल केले नाहीत. त्यामुळे पुण्यातील निर्बंध हटवले जावे. यासाठी पुण्यातील व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार एकवटले आहेत. त्यांच्या नाराजी दिसून येत आहे. पुण्यात दुपारी चार पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी असल्याने आम्ही व्यवसाय कसा करायचा? हा मुळात प्रश्न व्यापारी वर्गांचे आहेत. यासाठी ऍनोडळाने देखील करण्यात आली आहेत. यासाठी भाजपने देखील पाठींबा दिला. यावरून आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Muralidhar Mohol) यांनी देखील नाराजी दर्शवली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

दरम्यान, यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी निर्बंध उठवण्याबाबत शासनाला पत्र पाठवले आहे.
राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पुण्यातील निर्बंध कमी करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Deputy Chief Minister Ajit Pawar) साकडे घातले आहे.
या बाबीचा विचार करता मुखयमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता मंजुरी दिली आहे.
दरम्यान उद्याच्या होणाऱ्या बैठकीत दुकानाच्या वेळा किती ठेवायच्या आणि बाकी निर्बंध बाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title : Pune Unlock | Restrictions to be relaxed in Pune from Monday? Discussions between Ajit Pawar and Uddhav Thackeray; The CM gave the ‘green’ signal

हे देखील वाचा :

Pune Corporation | शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन लागले कामाला

PMRDA | पीएमआरडीएचा विकास आराखडा जाहीर ! धरणे, कालवे परिसरात 20 टक्के बांधकामास परवानगी

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती 

Related Posts